Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

एस.टी.बस इको वाहन अपघात शाळेतील १० लहान मुलं जखमी.शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक?

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 1, 2026
in क्राईम, जळगाव
0

उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
यावल कडून बोरावल गावाकडे जाणाऱ्या एसटी बसने शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या ईको या वाहनाला जोरदार धडक दिल्याने आज सकाळी मोठा अपघात घडला.या अपघातात इको वाहन चालकासह सुमारे १० ते १२ लहान बालके तथा शालेय विद्यार्थी जखमी झाले तर २ विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची चर्चा आहे.
या अपघातामुळे शालेय विद्यार्थ्यांची सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध वाहतूक बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.एस.टी बसचे वाहक एस.एम.पाटील व चालक ए.ए.तडवी हे होते.
घटनेनंतर परिसरात शैक्षणिक क्षेत्रात आणि संबंधित पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आणि सर्वांनी यावल ग्रामीण रुग्णालयात लहान लहान बालकांना पाहण्यासाठी गर्दी केली
सकाळी साडेसातच्या सुमारास एमएच ४० एन ९८४५ क्रमांकाची यावल-टाकरखेडा मार्गावरील एसटी बस भालशिव पिंप्री फाट्यावरून जात असताना, भालशिव पिंप्रीकडून यावलच्या एका खासगी शाळेकडे विद्यार्थी घेऊन जाणारी एमएच ३७ जी ६६८० क्रमांकाची ईकोकार समोर आली. यावेळी दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली.
धडक जोरदार लागल्याने ईको कारमधील चालक व विद्यार्थी जखमी झाले. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. बोरावल परिसरातील तसेच यावल शहरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.जखमी विद्यार्थ्यांवर यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रथमोपचार केले. तर गंभीर जखमी विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.यात दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.अपघातातील विद्यार्थी वाहतूक करणारी ईको कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
अपघाताची माहिती मिळता बरोबर यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी यावल ग्रामीण रुग्णालय व पोलीस ठाण्यात भेट देऊन अपघाताची माहिती घेतली तसेच
जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.या घटनेमुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीमुळे आणि त्यांच्या शैक्षणिक हक्क आणि सुरक्षतेबाबत समाजात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Previous Post

दुसखेडा रेल्वे स्टेशनजवळील आंबेडकर नगरकडे दुर्लक्ष? डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुल्या सभागृहाची दुरवस्था; आमदारांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी

Next Post

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

Next Post

'दैनिक हॅलो बातमीदार'च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..