Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 1, 2026
in आरोग्य, शासकीय
0

कोरपावली (प्रतिनिधी): सामान्य जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरुद्ध ‘दैनिक हॅलो बातमीदार’ ने उघडलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. कोरपावली परिसरात बेकायदेशीरपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरविरुद्ध प्रशासनाने अखेर कारवाईचा बडगा उगारला असून, आरोग्य विभागाने या डॉक्टरला व्यवसाय तत्काळ बंद करण्याची नोटीस बजावली आहे.

कोरपावली गावात कोणतीही अधिकृत पदवी नसताना एक बंगाली डॉक्टर प्रॅक्टिस करत असल्याची माहिती समोर आली होती. या गंभीर प्रकारामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले होते. या संदर्भात ‘दैनिक हॅलो बातमीदार’ कडे तक्रारी प्राप्त होताच, त्यांनी पुराव्यासह प्रशासनाकडे या अनधिकृत व्यवसायाचा पाठपुरावा केला होता. ‘हॅलो बातमीदार’च्या कार्यकारी संपादक प्राजक्ता तायडे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि दिलेल्या तक्रारीची दखल घेत आरोग्य विभाग खडबडून जागा झाला.

सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला भंगाळे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी राजू तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी कोरपावली येथे प्रत्यक्ष भेट देऊन कारवाई केली. यावेळी संबंधित बोगस डॉक्टरला सक्त ताकीद देण्यात आली की:
वैद्यकीय व्यवसाय तत्काळ बंद करावा.
यापुढे विनापरवाना रुग्ण सेवा देताना आढळल्यास थेट फौजदारी गुन्हा (FIR) दाखल केला जाईल.

    दैनिक हॅलो बातमीदारचा प्रभाव
    या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आरोग्य विभागाने केलेल्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे. ‘दैनिक हॅलो बातमीदार’ने केवळ बातमी प्रसिद्ध न करता, कार्यकारी संपादक प्राजक्ता तायडे यांनी प्रत्यक्ष तक्रार नोंदवून पाठपुरावा केल्यामुळेच हा ‘बोगस’ कारभार उघडकीस आला आहे.
    “जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या कोणत्याही बोगस डॉक्टरची गय केली जाणार नाही. प्रशासकीय कारवाईत हयगय झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा यानिमित्ताने देण्यात आला आहे.

    Previous Post

    एस.टी.बस इको वाहन अपघात शाळेतील १० लहान मुलं जखमी.शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक?

    Next Post

    आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

    Next Post

    आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या बातम्या

    परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

    April 16, 2026

    सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

    April 16, 2026

    राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी;जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले….

    April 16, 2026

    साकळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

    April 15, 2026

    शेठ ला. ना. सा.विद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात

    April 15, 2026

    कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

    April 12, 2026
    Hello Batmidar

    © 2025 Powered by ContentOcean Infotech..

    No Result
    View All Result
    • Home
    • ताज्या बातम्या
    • देश-विदेश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • राजकीय
    • क्राईम
    • शैक्षणिक
    • सामाजिक

    © 2025 Powered by ContentOcean Infotech..