Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

नगरमध्ये तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण; भरवस्तीत चोरीचा धुमाकूळ,

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 11, 2026
in क्राईम
0

​अहिल्यानगर /प्रशांत बाफना
जुन्या भांडणाची कुरापत काढून एका तरुणाचे दुचाकीवरून अपहरण करून त्याला जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना रुईछत्तीशी परिसरात घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​रविंद्र संतोष शिंदे (वय ३०) हे जनसेवा हॉटेल येथे नाश्ता करत असताना आरोपी गणेश देवराम छत्तीशे याने त्यांना बळजबरीने दुचाकीवर बसवून नेले. ‘तू सागर जगदाळे सोबत फिरतोस आणि माझ्याविरुद्ध बोलतोस’ असे म्हणत आरोपीने रविंद्र यांचा १६ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेतला. गुणवडी तलावात ढकलून देऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याने रविंद्र यांनी धावत्या दुचाकीवरून उडी मारून स्वतःचा बचाव केला. मात्र, आरोपीने पाठलाग करून त्यांना दगड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

​या घटनेनंतर फिर्यादीचा चुलत भाऊ गणेश शिंदे आणि मित्र आरोपीच्या घरी मोबाईल मागण्यासाठी गेले असता, आरोपी गणेश छत्तीशे आणि प्रशांत देवराम छत्तीशे यांनी त्यांनाही हातातील कड्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच चाकूचा धाक दाखवून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस उपनिरीक्षक धुमाळ पुढील तपास करत आहेत.

शहरटाकळी परिसरात अपहरणाचा प्रयत्न
शेवगाव – शेवगाव तालुक्यातील ढोरसडे येथील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीचा शहरटाकळी परिसरात अपहरणाचा प्रयत्न झाला. चारचाकी गाडीतून तिघांनी ढोरसडे-शहरटाकळी रस्त्यावर एकटी असलेल्या रितिषा हिला पकडून गाडीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने कसाबसा बचाव करत बाजूला पळाली. समोरून दुसरी गाडी येत असल्या कारणाने त्यांनी लगेच पळ काढला. परिसरात पालकांनी आपल्या पाल्यांना एकटे न सोडता कायम सतर्क रहावे. विद्यार्थ्यांनीही रस्त्याने घरी जाताना गटाने जावे, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य कांतेश्वर ढोले, प्रभारी प्राचार्य सुनिल जायभाये यांनी केले आहे.

अहिल्यानगरमध्ये भरवस्तीत चोरीचा धुमाकूळ; बंद घरांचे कडी-कोंडा तोडून २० हजारांचा ऐवज लंपास
​अहिल्यानगर: शहरातील नवी पेठ आणि पटवर्धन चौक परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एका घरासह इतर दुकानांवर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

​रतन भवन परिसरातील रहिवासी आणि कॉलेज कॅन्टीन चालक कृष्णगोपाळ सत्यनारायण चौहाण हे कुटुंबासह ७ फेब्रुवारी रोजी नातेवाईकांकडे गेले होते. १० फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांच्या शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहिले. चौहाण यांनी घरी येऊन पाहिले असता, चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोंडा तोडून घरातील पितळी भांडी, तांब्याचे ताट, लोटे, गॅस टाक्या आणि चांदीचे पैंजण असा एकूण २० हजार रुपयांचा माल चोरून नेला आहे.
​केवळ चौहाण यांच्याच घरी नव्हे, तर चोरट्यांनी परिसरातील आनंद प्रकाश गुंदेचा यांचे दुकान फोडले असून संतोष प्रकाश काकडे, योगीता सतीश पुरोहित आणि राजेंद्र गंगाधर भुमकर यांच्या घराचे कडी-कोंडा तोडून चोरीचा प्रयत्न केला आहे. एकाच रात्री अनेक ठिकाणी झालेल्या या चोरीच्या सत्रामुळे परिसरात खळबळ माजली आहे. कृष्णगोपाळ चौहाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

माळीवाडा परिसरात भररस्त्यात अश्लील हावभाव करणाऱ्या ११ महिला पोलिसांच्या जाळ्यात
​अहिल्यानगर –
शहरातील माळीवाडा वेस ते माळीवाडा बसस्थानक परिसरात सार्वजनिक रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अश्लील हावभाव करून व गाणी म्हणून खुणावणाऱ्या ११ महिलांना कोतवाली पोलिसांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतले. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अंमलदार रोहिणी अशोक दरंदले यांनी सरकार पक्षातर्फे फिर्याद दिली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, माळीवाडा परिसरात काही महिला रस्त्यावर उभ्या राहून अश्लील वर्तन करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षकांना नागरिकांकडून मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी सपोनि तेजश्री थोरात, मपोसई शितल मुगडे आणि त्यांच्या पथकाने खासगी वाहनाने परिसरात गस्त घातली. रात्री साडेआठच्या सुमारास पोलिसांनी पंचासमक्ष पाहणी केली असता, काही महिला तोंडाला स्कार्फ बांधून नागरिकांना अश्लील साद घालत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शिफाली रॉय, अनिमा विश्वास, गायत्री डोके, काकोली विश्वास, रेणुका पेठेकर, दैवशिला गर्जे, कविता पवार, सोनाली देशमुख, जीजी पवाय, रुपा अन्सारी आणि सुमन त्रिभुवन यांना ताब्यात घेतले.

​या सर्व महिलांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २७१, २९२, २९६ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०, ११७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार औटी करत आहेत. सार्वजनिक शांतता व नैतिकता बिघडवणाऱ्या अशा प्रवृत्तींवर पोलिसांची करडी नजर राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

रुईछत्तीशीत हॉटेल कामगारावर जीवघेणा हल्ला; लोखंडी वस्तूने डोके फोडले
​अहिल्यानगर: नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुईछत्तीशी परिसरात एका हॉटेल कामगारावर जुन्या वादातून लोखंडी वस्तूने आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेल जय मल्हार समोर झालेल्या या हल्ल्यात संबंधित कामगार गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गंगा अर्जुन सुनार यांचे पती येथील एका हॉटेलमध्ये कामाला आहेत. महिनाभरापूर्वी आरोपींनी ‘आमच्या हॉटेलवर कामाला आला नाही तर तुला उचलून नेऊ’, अशी धमकी दिली होती. ६ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादीचे पती हॉटेलकडे जात असताना, आरोपी संजय दत्तात्रय नाईक आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवले.

​काही समजण्यापूर्वीच आरोपी संजय नाईक याने लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यात प्रहार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्याचवेळी त्याच्या इतर दोन साथीदारांनी लाकडी दांडक्याने पाठीवर मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच पुन्हा दिसल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी पसार झाले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

​याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सपोनि प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत

Previous Post

डिझेलअभावी साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राची 102 रुग्णवाहिका ठप्प गरोदर मातांची जीवाशी खेळ! जबाबदार कोण?

Next Post

बस स्टॅण्ड परिसरात अश्लील हावभाव करुन गाणे म्हणुन शहरातील वातावरण दुषित करणारे ११ महिलांवर कोतवाली पोलीसांची कारवाई

Next Post

बस स्टॅण्ड परिसरात अश्लील हावभाव करुन गाणे म्हणुन शहरातील वातावरण दुषित करणारे ११ महिलांवर कोतवाली पोलीसांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यात ‘माझ गांव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान…. ग्रामपंयातींना पाच कोटींचे पुरस्कार

February 11, 2026

बस स्टॅण्ड परिसरात अश्लील हावभाव करुन गाणे म्हणुन शहरातील वातावरण दुषित करणारे ११ महिलांवर कोतवाली पोलीसांची कारवाई

February 11, 2026

नगरमध्ये तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण; भरवस्तीत चोरीचा धुमाकूळ,

February 11, 2026

डिझेलअभावी साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राची 102 रुग्णवाहिका ठप्प गरोदर मातांची जीवाशी खेळ! जबाबदार कोण?

February 11, 2026

शिरसाड येथे किनगाव श्री क्षेत्र मुक्ताई पायी दिंडीचे जल्लोषात स्वागत  तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते पूजन, महाप्रसादाने भक्तिमय वातावरण

February 10, 2026

२४ तास, ४० विभाग आणि लाखो भक्त! शिर्डीच्या ‘दिव्य’ व्यवस्थेची ही आहे खरी ताकद! ६००० हातांची अविरत सेवा आणि अंगावर शहारे आणणारा भक्तिमय प्रवास!

February 10, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..