Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का?, खासदार बजरंग सोनवणेंच्या दाव्याने खळबळ

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 7, 2026
in राजकीय
0

बीड/प्रशांत बाफना
अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी रोज नवनवे दावे केल जात आहेत. अशातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी याप्रकरणी संशय व्यक्त केला आहे. अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का? असा प्रश्न खासदार सोनवणें यांनी उपस्थित केल्याने खळबळ उडाली आहे.

अजित पवार यांचा बारामतीच्या विमानतळावर विमान अपघातात मृत्यू झाला या घटनेस 10 दिवस झाल आहेत. मात्र, अद्याप पर्यंत तपास यंत्रणा कुठल्याच ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे गेल्या दहा दिवसात या अपघातासंदर्भात राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रकारे शंका व्यक्त केल्या जात आहेत.

राष्ट्रवादी (अजित पवारगट) आमदार आमोल मिटकरी यांनी डीजीसीए च्या माहितीनुसार विमानात 6 लोक होते, पण प्रत्यक्षात 5 मृतदेह कसे सापडले? स्फोट होऊन विमान जळून खाक होतंय, मग कागदपत्रे कशी जळत नाहीत? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

काँग्रेसनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या प्रवासासाठी बंदी असलेल्या कंपनीचे विमान कसे? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांनी कॅप्टन मदन आणि कॅप्टन यश ट्राफिकमध्ये अडकल्याचा दावा त्यामुळे दोघांचा एकाच वेळी उशीर का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास सध्या सीआयडीमार्फत सुरू आहे. त्यातच नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि खळबळजनक दावे यामुळे दादांच्या विमान अपघाताचा सस्पेन्स दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अपघातानंतर विमानातील ब्लॅकबॉक्स ही यंतणाच्या हाती लागला आहे. मात्र ब्लॅकबॉक्समधील माहितीचं विश्लेषन करण्यास इतका वेळ का लागतोय? प्राथकमिक चौकशी अहवाल समोर आला असला तरी अंतिम निष्कर्षापर्यंत तपास यंत्रणा कधी पोहचणार हा खरा प्रश्न आहे.

अजित दादांच्या अपघातावर खुलासा करणार : अजित दादांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे पवार कुटुंबासह महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. आणखीही विश्वास बसत नाही दादा आपल्यात नाहीत. त्यातच विमान अपघाता बाबत रोज नवनवे दावे समोर येत आहेत.त्यातच आता राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार म्हणाले की पवार कुटुंबीयांना मिळालेल्या माहिती, आणखी काही माहिती येणार आहे त्यानुसार येत्या 10 आणि 12 फेब्रूवारी रोजी पत्रकार परिषदेत अजितदादांच्या विमान अपघाताचा खुलासा करणार असल्याचे रोहित पवार म्हणाले

Previous Post

अजितदादांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल आला, तांत्रिक बिघाड, लँडिंगचा अँगलच चुकला?

Next Post

इचखेडा मार्गावरील खालकोट वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड? वन अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह, चौकशीची मागणी तीव्र

Next Post

इचखेडा मार्गावरील खालकोट वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड? वन अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह, चौकशीची मागणी तीव्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरण कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे कंटाळवाणं लोडशेडिंग…! सायंकाळी होतोय डासांचं प्रचंड सुळसुळाट…! सकाळच्याऐवजी संध्याकाळी वीजपुरवठा सुरु करण्याची मागणी…!

March 26, 2026

सावदा येथील सरकारी दूध डेअरीत पोलिसांचा मोठा छापा; दुधाच्या आड सुरू असलेली दारूची तस्करी उघड

March 26, 2026

किनगाव आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा; दोन गरोदर मातांना एकाच बेडवर उपचार! प्रशासन झोपेत?

March 25, 2026

रावेर–यावल तालुक्यात भोंदू बाबा अशोक खरातचे ‘कनेक्शन’ ? अधिकाऱ्यांपासून नागरिकांपर्यंत चर्चेला उधाण

March 25, 2026

अवैध वृक्षतोडीला पाठीशी कोण? यावलमध्ये आंदोलनाची घोषणा

March 24, 2026

परसाळे बुद्रुक येथे १२ एप्रिल रोजी आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा सामूहिक विवाह आयोजन

March 24, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..