Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

इंस्टाग्रामवर ओळख, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; नगर तालुक्यातील घटना…

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 10, 2026
in क्राईम
0

अहिल्यानगर/प्रशांत बाफना- सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करून एका युवतीला लॉजवर घेऊन जात तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित 24 वर्षीय युवतीच्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात तरूणाविरूध्द अत्याचार, अ‍ॅट्रॉसिटी कलमान्वये शुक्रवारी (8 मे) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुर बाळकिसन दरेकर (रा. वाळुंज, ता. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी युवती मुळची अमरावती जिल्ह्यातील असून ती सध्या शिरूर (जि. पुणे) तालुक्यात राहते. तिची मयुर दरेकर याच्यासोबत सोशल मीडियावर ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर त्याने युवतीकडे विवाहाची मागणी घातली. मात्र, युवतीने विवाह करण्यास नकार दिला. त्यानंतर मयुर याने पीडितेचे फोटो समाज माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी दिली. या भीतीपोटी पीडितेने मयुरचे ऐकले.

मयुरने तिला अरणगाव (ता. अहिल्यानगर) परिसरातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मयुर दरेकर याच्याविरूध्द गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपअधीक्षक (अहिल्यानगर ग्रामीण) शिरीष वमने या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत

Previous Post

शाईफेक प्रकरणात आमदार संग्राम जगताप यांची उडी, काय म्हणाले पहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंस्टाग्रामवर ओळख, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; नगर तालुक्यातील घटना…

May 10, 2026

शाईफेक प्रकरणात आमदार संग्राम जगताप यांची उडी, काय म्हणाले पहा

May 9, 2026

साखरपुड्याच्या सोहळ्यात चोरट्यानी मारला लाखो रुपयांच्या सोन्यावर डल्ला

May 9, 2026

अवैध धंदे करणाऱ्यांच्या मागे लागणार आता या ‘डॅशिंग पोलीस ऑफिसर’ची ‘साडेसाती’ …! एसपी मुम्मका सुदर्शन पहिल्या काही दिवसांतच ‘ॲक्शन मोड’वर…! इच्छाशक्ती आणि ‘इन्फॉर्मेशन सोर्स’च्या पाठबळावर १ कोटी ४६ लाखांची सुपारी केली जप्त…

May 9, 2026

जळगाव PWD हादरले! ५ लाखांची लाच स्वीकारताना कनिष्ठ अभियंता योगेश अहिरे एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026

किरण कडू पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड

May 9, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..