Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

यावल तालुका आरोग्य विभागाचा पुढाकार  क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप; उपचारासोबत पोषणावरही भर

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 7, 2026
in आरोग्य
0

उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
यावल (दि. 06 फेब्रुवारी 2026) — क्षयरोगाविरुद्धच्या लढ्यात रुग्णांना उपचारासोबत योग्य पोषण मिळावे यासाठी यावल तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात आज महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. आयुध निर्माणी वरणगाव व जिल्हा क्षयरोग केंद्र जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले.
हा उपक्रम जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. विशाल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश चौधरी यांच्या हस्ते लाभार्थी रुग्णांना किट वितरित करण्यात आले.
यावेळी आरोग्य सेविका रमा पवार, आरोग्य सेवक सल्लाऊद्दीन शेख, आरोग्य सेविका मनिषा कोळी, वरिष्ठ क्षयरोग अधिकारी मिलिंद राणे, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व लाभार्थी क्षयरुग्ण उपस्थित होते.
कार्यक्रमात डॉ. मुकेश चौधरी यांनी क्षयरुग्णांना नियमित उपचार, औषधोपचार पूर्ण करण्याचे महत्त्व आणि पोषणयुक्त आहाराची गरज याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. “क्षयरोगावर मात करण्यासाठी औषधांसोबतच सकस आहार अत्यंत आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून आरोग्य विभागाच्या या संवेदनशील पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Previous Post

साकळीच्या मातीतून उगवला ‘कृषीसेवक’! प्रगतिशील शेतकरी दीपक महाजन यांचा राज्यस्तरीय सन्मान

Next Post

अजितदादांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल आला, तांत्रिक बिघाड, लँडिंगचा अँगलच चुकला?

Next Post

अजितदादांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल आला, तांत्रिक बिघाड, लँडिंगचा अँगलच चुकला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का?, खासदार बजरंग सोनवणेंच्या दाव्याने खळबळ

February 7, 2026

अजितदादांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल आला, तांत्रिक बिघाड, लँडिंगचा अँगलच चुकला?

February 7, 2026

यावल तालुका आरोग्य विभागाचा पुढाकार  क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप; उपचारासोबत पोषणावरही भर

February 7, 2026

साकळीच्या मातीतून उगवला ‘कृषीसेवक’! प्रगतिशील शेतकरी दीपक महाजन यांचा राज्यस्तरीय सन्मान

February 7, 2026

सियोना उर्फ स्विटीबाळाचा पहिला वाढदिवस स्नेहसदन चर्चमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

February 7, 2026

कल्याण येथे सिम्बिंयोसिस शाळेत अलियान तडवी आदिवासी विद्यार्थ्याने काठी फिरवून केले जोरदार प्रदर्शन

February 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..