Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात समता सैनिक दलाची दमदार ताकद उभी पूर्व व पश्चिम अशा दोन जिल्हा कार्यकारिणींची घोषणा; यावल तालुक्यात नव्या नेतृत्वाची निवड

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 6, 2026
in सामाजिक
0

उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
विश्वभूषण विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाच्या जळगाव जिल्हास्तरीय बैठकीत संघटन बळकट करण्याच्या दिशेने मोठा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यात पूर्व आणि पश्चिम अशा दोन स्वतंत्र जिल्हा कार्यकारिणी स्थापन करण्यात आल्या. ५ फेब्रुवारी रोजी पार पडलेली ही बैठक राज्याध्यक्ष मा. धर्मभूषण बागुल यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.
या बैठकीला जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुक्यांमधील कार्यकर्त्यांची भक्कम उपस्थिती होती. विशेष म्हणजे महिला कार्यकर्त्यांचाही मोठा सहभाग दिसून आला. बैठकीत समता सैनिक दलाची ऐतिहासिक वाटचाल, संघर्षशील परंपरा, शिस्त आणि तत्वनिष्ठ भूमिका यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बोलताना
पदाधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व भारतीयांवर अमूल्य उपकार आहेत, हे सर्वजण मान्य करतात; मात्र त्यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलात सामील होण्याबाबत उदासीनता का? असा थेट सवाल उपस्थित करून कार्यकर्त्यांना संघटन विस्तारासाठी सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले.
देशातील सध्याची सामाजिक व राजकीय परिस्थिती लक्षात घेता बाबासाहेबांचे विचार घराघरात आणि गावागावात पोहोचविण्याची जबाबदारी समता सैनिक दलाने घ्यावी, तसेच सर्व जाती-धर्मातील नागरिकांना संघटनेत सामावून घेण्यावर भर द्यावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
बैठकीचे आयोजन राज्य संघटक आयु. विजय निकम आणि जिल्हाध्यक्ष आयु. किशोर डोंगरे यांनी केले.
जळगाव जिल्हा पश्चिम कार्यकारिणी अध्यक्ष – किशोर डोंगरे (पाचोरा), उपाध्यक्ष – विलास शिंदे (जळगाव), सचिव – अनिल सोनवणे (भुसावळ), सहसचिव – वाल्मीक शिरसाठ (भडगाव), भाईदास गोलाईत (चाळीसगाव), प्रसिद्धीप्रमुख – अरुण खैरे (पाचोरा), संघटक – गोकुळ अहिरे (एरंडोल), सरलाबाई गायकवाड (पाचोरा), अभिमन्यू बाविस्कर (पाचोरा), संतोष भालेराव (अमळनेर), प्रचारक – अलकाताई मोरे (भडगाव), किरण रमेश शर्मा (जळगाव).जळगाव पूर्व जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष – संजय तायडे (बोदवड), उपाध्यक्ष – प्रमोद बावस्कर (भुसावळ), सचिव – मिलिंद जंजाळे (यावल), सहसचिव – शरद बाविस्कर (जामनेर), मुख्य संघटक – सुपडू सनदाशिव (यावल), संघटक – नितीन सुरवाडे (बोदवड), शालूताई भालेराव (चोपडा), प्रचारक – कलावती गायकवाड (यावल).याच बैठकीत यावल तालुका अध्यक्षपदी अशोक अडकमोल आणि सचिवपदी सतीश अडकमोल (मोहराळा) यांची निवड जाहीर करण्यात आली. या निवडीमुळे यावल तालुक्यात संघटनात्मक कामाला नवी गती मिळणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
समता सैनिक दलाच्या या नव्या संघटनात्मक बांधणीमुळे जळगाव जिल्ह्यात दलाची ताकद वाढणार असून, बाबासाहेबांचे विचार अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

Previous Post

पोटच्या मुलीला मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर लैंगिक अत्याचार पाचोरा तालुक्यातील नराधमा विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

Next Post

कल्याण येथे सिम्बिंयोसिस शाळेत अलियान तडवी आदिवासी विद्यार्थ्याने काठी फिरवून केले जोरदार प्रदर्शन

Next Post

कल्याण येथे सिम्बिंयोसिस शाळेत अलियान तडवी आदिवासी विद्यार्थ्याने काठी फिरवून केले जोरदार प्रदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कल्याण येथे सिम्बिंयोसिस शाळेत अलियान तडवी आदिवासी विद्यार्थ्याने काठी फिरवून केले जोरदार प्रदर्शन

February 6, 2026

जळगाव जिल्ह्यात समता सैनिक दलाची दमदार ताकद उभी पूर्व व पश्चिम अशा दोन जिल्हा कार्यकारिणींची घोषणा; यावल तालुक्यात नव्या नेतृत्वाची निवड

February 6, 2026

पोटच्या मुलीला मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर लैंगिक अत्याचार पाचोरा तालुक्यातील नराधमा विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

February 6, 2026

यावल पंचायत समितीत आमदार अमोल जावळे यांची अचानक धडक  गटविकास अधिकारी गैरहजर; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर संतापाचा स्फोट!

February 6, 2026

अतिक्रमणधारकांनी घेतला आयुक्तांचा धसका दुसर्‍या दिवशी माळीवाडा, एसटी स्टँड परिसरातील अतिक्रमणे हटवली

February 5, 2026

मराठीचा अपमान खपवून घेणार नाही : मनविसेचा विद्यापीठ प्रशासनाला कडक इशारा

February 5, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..