Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

ज्योती विद्या मंदिर सांगवी बु!! येथे एनसीसी कॅडेट्सचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 2, 2026
in शैक्षणिक
0

तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर

ज्योती विद्या मंदिर, सांगवी बुद्रुक येथे सन २०२४ ते २०२६ या दोन वर्षांच्या कालावधीत एनसीसी ग्रुप सांगवी बुद्रुक अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या छात्रसैनिकांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. एम. भंगाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट डॉ. दीपक पाटील (पी.ओ., नाहटा महाविद्यालय, भुसावळ) तसेच आय.सी.टी.सी. समुपदेशक श्री. वसंत संदानशिव यांची उपस्थिती लाभली.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात एनसीसीचे महत्त्व विशद करताना सांगितले की, एनसीसीमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच संरक्षण सेवेमध्ये करिअरच्या विविध संधी उपलब्ध होतात. अकरावी–बारावीच्या काळात एनडीएची तयारी केल्यास अधिकारी होण्याची सुवर्णसंधी मिळू शकते. एनसीसीमुळे केवळ वैयक्तिक जीवनात शिस्त निर्माण होत नाही, तर सामाजिक जाणीव आणि नेतृत्वगुणही विकसित होतात, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी जिल्हा नियंत्रण पथक, जळगाव, रेड रिबन क्लब व ग्रामीण रुग्णालय, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. हे पुरस्कार वितरण समुपदेशक श्री. वसंत संदानशिव यांच्या शुभहस्ते पार पडले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री. भंगाळे सर यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थी दशेपासून नियमित अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते. अभ्यासाचे योग्य नियोजन करून दररोज किमान दोन ते तीन तास वाचन व लेखन केल्यास परीक्षेच्या काळात तणाव जाणवत नाही, असे त्यांनी सांगितले.
यावेळी छात्रसैनिक हिमेक्षा कोळी, प्रज्ञा बनसोडे, हिमांशू येवले व मिलिंद धनगर यांनी मनोगत व्यक्त करत एनसीसीतील आपल्या अनुभवांचे कथन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी अधिकारी श्री. पी. एम. भंगाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व एनसीसी कॅडेट्स यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

5 फेब्रुवारी रोजी जळगांव येथे समता सैनिक दलची जिल्हास्तरीय बैठक.

Next Post

नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमचा मूकनायक पत्रकार वर्धापन दिन व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा शेगाव येथे उत्साहात साजरा

Next Post

नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमचा मूकनायक पत्रकार वर्धापन दिन व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा शेगाव येथे उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाईफेक प्रकरणात आमदार संग्राम जगताप यांची उडी, काय म्हणाले पहा

May 9, 2026

साखरपुड्याच्या सोहळ्यात चोरट्यानी मारला लाखो रुपयांच्या सोन्यावर डल्ला

May 9, 2026

अवैध धंदे करणाऱ्यांच्या मागे लागणार आता या ‘डॅशिंग पोलीस ऑफिसर’ची ‘साडेसाती’ …! एसपी मुम्मका सुदर्शन पहिल्या काही दिवसांतच ‘ॲक्शन मोड’वर…! इच्छाशक्ती आणि ‘इन्फॉर्मेशन सोर्स’च्या पाठबळावर १ कोटी ४६ लाखांची सुपारी केली जप्त…

May 9, 2026

जळगाव PWD हादरले! ५ लाखांची लाच स्वीकारताना कनिष्ठ अभियंता योगेश अहिरे एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026

किरण कडू पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड

May 9, 2026

यावल तालुक्यातील चिखली खुर्द येथील आदिवासी भिल्ल बांधवांच्या विकासासाठी भिमशक्ती सामाजिक संघटनेचे निवेदन

May 9, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..