Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

साकळीचा गौरवरशियातील कुर्बान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीतून मोईझ खान इरफान खान प्रथम प्रयत्नात MBBS उत्तीर्ण साकळी गावातून मुस्लिम समाजातील पहिले डॉक्टर

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 30, 2026
in शैक्षणिक
0

उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
साकळी गावासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण ठरला आहे. रशियातील कुर्बान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी येथून मोईझ खान इरफान खान यांनी MBBS परीक्षा पहिल्याच प्रयत्नात भारतातून मोठ्या गुणांनी उत्तीर्ण होत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे साकळी येथील मुस्लिम समाजातून MBBS उत्तीर्ण होणारे ते पहिलेच डॉक्टर ठरले आहेत.या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण साकळी गावासह मुस्लिम समाजात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले असून, मोईझ खान यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजात नवा आदर्श निर्माण करणाऱ्या या यशस्वी डॉक्टराचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या सत्कारप्रसंगी माजी उपसरपंच मो. वासिम खान हाजी आसिफ खान,
माजी उपसरपंच मुसेखा इसेखा पठाण,माजी ग्रामपंचायत सदस्य सैय्यद अहमद सैय्यद मिरा,माजी ग्रामपंचायत सदस्य सर्फराज तडवी,सामाजिक कार्यकर्ते शेख सलीम अब्दुलहक, बिस्मिल्लाह खान लालखान,मिलिंद जंजाळे, शाहरुख खान, शेख रिझवान, रफिक खान,शेख साबीर, शेख अकील, इरफान खान,यांच्यासह मुस्लिम बांधव व गावातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. मोईझ खान इरफान खान हे साकळी येथील अंजुमन इस्लाम हायस्कूलचे प्राचार्य इरफान खान अलीशेरखा यांचे चिरंजीव असून, त्यांच्या या यशामागे कुटुंबीयांचे मार्गदर्शन, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यास कारणीभूत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
मोईझ खान यांच्या या यशामुळे साकळीतील तरुण पिढीला वैद्यकीय शिक्षणाची नवी प्रेरणा मिळाली असून, “ग्रामीण भागातूनही जागतिक स्तरावर यश मिळवता येते” हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

Previous Post

शेवटचं दर्शन मिळालं नाही, अजित दादाच्या चितेपुढे डोकं टेकवलं …

Next Post

रावेर पंचायत समितीतील गंभीर दुर्लक्ष उघडअभियंत्याच्या निष्क्रियतेमुळे प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्हदोषींवर तात्काळ निलंबनाची मागणी

Next Post

रावेर पंचायत समितीतील गंभीर दुर्लक्ष उघडअभियंत्याच्या निष्क्रियतेमुळे प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्हदोषींवर तात्काळ निलंबनाची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध धंदे करणाऱ्यांच्या मागे लागणार आता या ‘डॅशिंग पोलीस ऑफिसर’ची ‘साडेसाती’ …! एसपी मुम्मका सुदर्शन पहिल्या काही दिवसांतच ‘ॲक्शन मोड’वर…! इच्छाशक्ती आणि ‘इन्फॉर्मेशन सोर्स’च्या पाठबळावर १ कोटी ४६ लाखांची सुपारी केली जप्त…

May 9, 2026

जळगाव PWD हादरले! ५ लाखांची लाच स्वीकारताना कनिष्ठ अभियंता योगेश अहिरे एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026

किरण कडू पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड

May 9, 2026

यावल तालुक्यातील चिखली खुर्द येथील आदिवासी भिल्ल बांधवांच्या विकासासाठी भिमशक्ती सामाजिक संघटनेचे निवेदन

May 9, 2026

अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळून तरुणाचा जागीच मृत्यू वाघोदा-निंभोरा रस्त्यावर हृदयद्रावक घटना; परिसरात शोककळा

May 9, 2026

सामाजिक कार्यकर्ते विनोद सोळंकी यांना सन्माननीय डॉक्टररेट पदवी व महात्मा गांधी उत्कृष्टता सेवा पुरस्कार प्रधान

May 9, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..