Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

देवदूत’ की ‘दानव’? जळगावात वैद्यकीय क्षेत्राला काळिमा!’हार्ट प्लस’च्या वासनांध डॉक्टरचा नर्सवर अत्याचार पती-पत्नीवर अखेर गुन्हा दाखल

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 29, 2026
in क्राईम
0

जळगाव : ज्या डॉक्टरांना आपण ‘देवदूत’ मानतो, तेच आता ‘राक्षस’ बनून वावरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जळगावातील ‘हार्ट प्लस हॉस्पिटल’ मध्ये काम करणाऱ्या एका असहाय्य नर्सचा विनयभंग करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या डॉ. संदीप भारुडे आणि त्याला साथ देणारी त्याची पत्नी डॉ. प्रीती भारुडे या विकृत दांपत्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण जळगाव शहर हादरले असून वैद्यकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे.
नेमका प्रकार काय?
जळगावातील बीएसएनएल ऑफिससमोरील ‘हार्ट प्लस हॉस्पिटल’ मध्ये पीडित विवाहिता २२ जुलै २०२५ रोजी नर्स म्हणून रुजू झाली होती. मात्र, रुग्णांची सेवा करण्यासाठी आलेल्या या महिलेवर रुग्णालयाचे संचालक डॉ. संदीप भारुडे याची वक्रदृष्टी पडली. सुरुवातीला “तुला काम जमत नाही,” असे म्हणत मानसिक छळ करण्यात आला. मात्र, हा केवळ बहाणा होता. त्यानंतर या नराधम डॉक्टरने पीडितेला वारंवार केबिनमध्ये बोलावून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली.
हद्द तर तेव्हा झाली, जेव्हा नोव्हेंबर महिन्यात या वासनांध डॉक्टरने उघडपणे पीडितेकडे ‘शरीरसुखाची मागणी’ केली. एका उच्चशिक्षित डॉक्टरची ही नीच मानसिकता समाजाला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे.
पत्नीचीही गुन्हेगारी साथ: ‘स्त्री’च बनली ‘स्त्री’ची शत्रू!
या प्रकरणात डॉक्टरची पत्नी डॉ. प्रीती भारुडे हिची भूमिका तर अधिकच संतापजनक आहे. स्वतः एक स्त्री असूनही, पतीच्या विकृत कृत्यांना आळा घालण्याऐवजी तिने पीडितेचे चारित्र्यहनन करण्यास सुरुवात केली. एम.आर.सोबतच्या संभाषणावरून पीडितेला टोमणे मारणे आणि तिचा मानसिक छळ करणे, असे प्रकार डॉ. प्रीती यांनी केले. एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या इज्जतीचे धिंडवडे काढणे कितपत योग्य आहे?
मुलांना मारण्याची धमकी: गुन्हेगारी वृत्तीचा कळस!
पीडितेने या अत्याचाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला असता, या डॉक्टर दांपत्याने गुन्हेगारी जगतालाही लाजवेल अशी धमकी दिली. “तुला आणि तुझ्या दोन्ही मुलांना कोणतेही औषध देऊन संपवून टाकेल,” अशी जीवघेणी धमकी देत पीडितेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला. या भीतीपोटी पीडित महिलेने नोकरी सोडली, पण अखेर हिंमत एकवटून तिने पोलिसांत धाव घेतली.
जनतेचा सवाल: अशा नराधमांना कठोर शिक्षा कधी?
दि. २५ सप्टेंबर ते १८ जानेवारी या काळात हा नंगा नाच सुरू होता. आता जिल्हापेठ पोलिसांनी या डॉक्टर दांपत्यावर गुन्हा दाखल केला असला तरी, केवळ कागदी कारवाई न करता अशा विकृतांना गजाआड करून त्यांचे लायसन्स रद्द करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Previous Post

प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचा अपमान!पालकमंत्री गिरीष महाजन यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणीयावलमध्ये आंबेडकरी संघटनांचा संतप्त एल्गार

Next Post

यावल तालुक्यात ‘कागदी’ ग्रामसभा! लोकशाहीची थट्टा की प्रशासनाची मिलीभगत?

Next Post

यावल तालुक्यात ‘कागदी’ ग्रामसभा! लोकशाहीची थट्टा की प्रशासनाची मिलीभगत?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध वृक्षतोडीला पाठीशी कोण? यावलमध्ये आंदोलनाची घोषणा

March 24, 2026

परसाळे बुद्रुक येथे १२ एप्रिल रोजी आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा सामूहिक विवाह आयोजन

March 24, 2026

यावल पोलिसांची धडक कारवाई : रात्रीच्या काँबिंगमध्ये गुन्हेगारांवर कडक प्रहार

March 24, 2026

धुळे जिल्ह्यात ‘बोगस’ डॉक्टरांना आरोग्य विभागाचेच अभय? तक्रारदार महिला पत्रकारावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट!

March 24, 2026

नगरपालिकेचा नगर शहारातील कर्मचारी लाच घेताना अटक

March 22, 2026

अखेर कॅप्टन खरात प्रकरणी रुपाली चाकणकरचा राजीनामा? राष्ट्रवादी उद्याच घेणार निर्णय; बोलावली तातडीची बैठक

March 21, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..