
अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
*_बालमटाकळी गावचे भूमिपुत्र श्री. बाळासाहेब रंगनाथ वाघुंबरे जे पुणे या ठिकाणी टेल्को या नामांकित कंपनीमध्ये कार्यरत आहेत..त्यांनी आपल्या मुलीच्या विवाह निमित्त सत्कार समारंभाला फाटा देत जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा बालमटाकळी या आपल्या बालपणी शिकलेल्या शाळेचे गुणवत्तापूर्ण काम पाहून शाळेला काही तरी मदत करण्याचा निश्चिय केला……! लग्न समारंभाचे औचित्य साधून त्यांनी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.बाबासाहेब सोनवणे यांच्याकडे रोख स्वरूपात ५००१ रुपये ची देणगी शाळेसाठी दिली.त्यांच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे वाघुंबरे कुटुंबीयांची सर्वत्र कौतुक होत आहे..! त्यांच्या या देणगी बद्दल गावचे सरपंच, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी आभार व्यक्त केले..! त्याचबरोबर बोधेगाव बीटचे विस्तार अधिकारी डॉ. गाडेकर साहेब गटशिक्षणाधिकारी श्रीमती राऊळ मॅडम यांनीही कौतुक केले.







