Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

संत गाडगेबाबा नगरपालिका दवाखान्याचे स्थलांतर थांबवा अन्यथा रिपब्लिकन सेनेचा वतीने तीव्र आंदोलन-विनोद सोनवणे जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेना

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 22, 2026
in राजकीय
0

उपसंपादक:- मिलिंद जंजाळे
नगरपालिकेतील सत्तांतरानंतर सध्या सत्ताधारी राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि भाजप यांच्यात कुरघोड्यांचे राजकारण रंगले आहे. मात्र, या राजकीय संघर्षात जनतेच्या आरोग्याशी खेळू नये. शहराचा विस्तार आणि गोरगरीब जनतेची सोय पाहता, मध्यवर्ती भागात असलेला ‘संत गाडगेबाबा नगरपालिका रुग्णालय’ कोणत्याही परिस्थितीत इतरत्र स्थलांतरित करू नये, रुग्णालयाची झालेली दुरवस्था दुर करुन उपचारासाठी दाखल रुग्णांना मोफत वैद्यकीय साधने व प्रशिक्षित डॉक्टरांची व्यवस्था करावी अशी आक्रमक भूमिका रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा नेते दिनेश इखारे,अरुण तायडे महिला सेना जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे यांनी पत्रकार परिषदेद्वारे मांडली आहे.
नगरपालिका प्रशासनाने जनहित लक्षात न घेता निव्वळ नगरपालिका सभागृह नाही व नगरसेवक यांना बसण्यासाठी जागा नाही याकरिता हा दवाखाना हलवण्याचा घाट घातला असून,या निर्णयाचा रिपब्लिकन सेनेने तीव्र निषेध केला आहे.
स्थलांतरास विरोधाची प्रमुख कारणे: सध्या सुरू असलेल्या नगरपालिकेमध्ये सभागृह व इतर व्यवस्था होऊ शकते
सध्याचा दवाखाना शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने सर्वसामान्य रुग्णांना तिथे पोहोचणे सोपे आहे. नवीन जागा लांब असल्याने रुग्णांना प्रवासाचा नाहक त्रास होईल.
दवाखाना लांब नेल्यास गोरगरिबांना आर्थिक फटका बसणार व त्यांना रिक्षा प्रवासासाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील.
आपत्कालीन परिस्थितीत सध्याचा दवाखाना जवळ असल्याने रुग्णांना तातडीने उपचार मिळतात. स्थलांतरामुळे ही महत्त्वाची सुविधा हिरावली जाईल. लांबच्या अंतरामुळे वृद्ध रुग्णांना चालत जाणे किंवा वारंवार प्रवास करणे शक्य होणार नाही.
प्रशासकीय कारभारावर प्रश्न्चिन्ह
भुसावळ ही ‘अ’ वर्ग नगरपालिका असतानाही शहरात १० ते १५ दिवसांआड पाणीपुरवठा होतो. रेल्वे परिसरातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. अशा गंभीर समस्या सोडवण्याऐवजी सत्ताधारी आणि विरोधक केवळ कुरघोड्यांच्या राजकारणात मग्न आहेत, असा आरोप जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी केला आहे.
दोषींवर कारवाईची मागणी
दुरुस्तीच्या नावाखाली हा दवाखाना जमीनदोस्त करण्याचे आदेश देणाऱ्यांवर प्रांताधिकाऱ्यांनी चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
आंदोलनाचा इशारा: > “प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून दवाखाना सध्याच्याच ठिकाणी सुरू ठेवावा. जर प्रशासनाने जनभावनेचा आदर केला नाही, तर रिपब्लिकन सेना नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल,” असा इशारा विनोद सोनवणे (जिल्हाध्यक्ष), दिनेश इखारे (जिल्हा नेते),वंदनाताई सोनवणे महिला सेना जिल्हाध्यक्षा यांनी प्रशासनाला दिला आहे.
यावेळी वंदनाताई आराक जिल्हा महासचिव, देवदत्त मकासरे मेजर जिल्हा उपाध्यक्ष,बंटी नरवाडे, सुनंदा मोरे, दिलीप भालेराव,वर्षा सपकाळे,मिना भालेराव, स्वप्नील सोनवणे,अक्षय सोनवणे, मयुर नरवाडे

Previous Post

दगडी येथे अरुणोदय सिकलसेल अ‍ॅनिमिया अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद ९८ लाभार्थ्यांची मोफत तपासणी, निदान-उपचार व जनजागृती

Next Post

अंधारमळी शाळा: वार्षिक स्नेहसंमेलनाने गाजवलं.विद्यार्थ्यांच्या सहभागातून आत्मविश्वास, संघभावना आणि शैक्षणिक कौशल्यांची चमक

Next Post

अंधारमळी शाळा: वार्षिक स्नेहसंमेलनाने गाजवलं.विद्यार्थ्यांच्या सहभागातून आत्मविश्वास, संघभावना आणि शैक्षणिक कौशल्यांची चमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का?, खासदार बजरंग सोनवणेंच्या दाव्याने खळबळ

February 7, 2026

अजितदादांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल आला, तांत्रिक बिघाड, लँडिंगचा अँगलच चुकला?

February 7, 2026

यावल तालुका आरोग्य विभागाचा पुढाकार  क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप; उपचारासोबत पोषणावरही भर

February 7, 2026

साकळीच्या मातीतून उगवला ‘कृषीसेवक’! प्रगतिशील शेतकरी दीपक महाजन यांचा राज्यस्तरीय सन्मान

February 7, 2026

सियोना उर्फ स्विटीबाळाचा पहिला वाढदिवस स्नेहसदन चर्चमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

February 7, 2026

कल्याण येथे सिम्बिंयोसिस शाळेत अलियान तडवी आदिवासी विद्यार्थ्याने काठी फिरवून केले जोरदार प्रदर्शन

February 6, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..