Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

दरोड्यातल्या आरोपी आणि त्याच्या साथीदारांकडून १२ गुन्हे उघडकीस…! अहिल्यानगर एलसीबीची दमदार कामगिरी…!

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 19, 2026
in क्राईम
0

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
दिनांक 15/01/2026 रोजी रोजी रात्री 02/00 वा.च्या सुमारास फिर्यादी यांची मुलगी आणि सवत असे घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करत चाकुचा धाक दाखवून सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम चोरुन नेली. सदर घटनेबाबत फिर्यादी श्रीमती विमल बबन ढाकणे (रा. ढाकणेवस्ती, शेवगाव जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगाव पोलीस ठाण्यात (गु.र.नं. 29/2026 बी. एन. एस. 2023) चे कलम 309 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर शहरामध्ये जबरी चोरी आणि घरफोडीचे गुन्हे करणारे आरोपींची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते.

सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये, अंमलदार दिपक घाटकर, बिरप्पा करमल, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, भिमराज खर्से, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, अमृत आढाव, प्रशांत राठोड महिला भाग्यश्री भिटे, वंदना मोडवे, चालक चंद्रकांत कुसळकर, उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक तयार करुन सदर पथकास घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत पथकास सूचना आणि मार्गदर्शन करुन पथकास रवाना करण्यात आलं होतं.

दरम्यान, या पथकानं गुन्ह्यातल्या आरोपींबाबत गोपनीय माहिती आणि व्यावसायीक कौशल्याच्या आधारे माहिती संकलित करुन आरोपीचे शोध घेत असता दोन दिवसांनी म्हणजेच दिनांक 17/01/2026 रोजी पथकास सदरचा गुन्हा आरोपी रोहित नादर चव्हाण याने त्याच्या साथीदारास केला असून तो बाराबाभळी ते चंदबीबी महाल परिसरात येथे येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने बाराबाभळी ते चंदबीबी महल परिसरात जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी काही इसम संशयितरित्या दिसून आले.

या पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेत त्यांचे नांव गांव विचारलं असता त्यांचे नावे रोहित नादर चव्हाण (वय- 26 वर्षे रा. चिचोंडी पाटील ता. जि. अहिल्यानगर, बंटी टाबर चव्हाण (वय- 27 वर्षे रा. म्हरोळा ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर), करण शिरसाठ भोसले (वय- 22 वर्षे रा. पिंपळवाडी, ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर), अज्ञान उर्फ राजु उर्फ सक्या वकील्या भोसल्या (वय -50 वर्षे रा. पिंपळवाडी ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर), विशाल टाबर चव्हाण (रा. म्हरोळा ता. पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर) (फरार) अशी असल्याचं सांगितलं.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या ताब्यातुन आणि आरोपींच्या सांगण्याप्रमाणे  7,02,000/- रु कि.चे 54 ग्रॅम वजानाचे सोन्याचे दागिणे आणि सोन्याची लगड 500/-रुपये किंमतीचे पाना आणि लोखंडी कटावणी, 1,00,000/- रु कि.ची मोटार सायकल असा एकूण 8,02,400/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे त्यांनी अशाप्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत काय, याबाबत सखोल आणि बारकाईने विचारपूस केली असता त्यांच्याकडून अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यातले १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.

ताब्यातील आरोपी मुद्देमालासह शेवगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील शेवगाव पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपी नामे अज्ञान उर्फ राजु उर्फ सक्या वकील्या भोसल्या हा कोठेवाडी खुनाच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगुन आल्यानंतर त्याच्या वरील साथीदासह त्याने हा गुन्हा केलेला आहे. सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या सुचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी केली

Previous Post

नगर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनिल चोभे,उपाध्यक्षपदी बाळासाहेब गदादे तर सचिवपदी शशिकांत पवार, खजिनदारपदी अविनाश निमसे

Next Post

पाचोरा रेल्वे स्थानकावर विविध मेल एक्सप्रेस साठी थांबा व लिफ्ट सुविधा ची मागणी.

Next Post

पाचोरा रेल्वे स्थानकावर विविध मेल एक्सप्रेस साठी थांबा व लिफ्ट सुविधा ची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जात नव्हे, माणूस मोठा” — एकतेचा संदेश देणारा विचार

May 10, 2026

खासदार लंके यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा रूबी हॉलमध्ये राजकीय नेत्यांच्या भेटी

May 10, 2026

इंस्टाग्रामवर ओळख, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; नगर तालुक्यातील घटना…

May 10, 2026

शाईफेक प्रकरणात आमदार संग्राम जगताप यांची उडी, काय म्हणाले पहा

May 9, 2026

साखरपुड्याच्या सोहळ्यात चोरट्यानी मारला लाखो रुपयांच्या सोन्यावर डल्ला

May 9, 2026

अवैध धंदे करणाऱ्यांच्या मागे लागणार आता या ‘डॅशिंग पोलीस ऑफिसर’ची ‘साडेसाती’ …! एसपी मुम्मका सुदर्शन पहिल्या काही दिवसांतच ‘ॲक्शन मोड’वर…! इच्छाशक्ती आणि ‘इन्फॉर्मेशन सोर्स’च्या पाठबळावर १ कोटी ४६ लाखांची सुपारी केली जप्त…

May 9, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..