Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

शेठ ला ना सार्व .विद्यालयात किशोर महोत्सव 25 चा बक्षीस वितरणाने समारोप”1200 विद्यार्थांचा केला सन्मान

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 28, 2025
in शैक्षणिक
0

जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला. ना सार्व .विद्यालयात किशोर महोत्सव – 25 चा समारोप बक्षीस वितरण कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस
प्रमुख अतिथी :महाराष्ट्रातील हास्यजत्रा फेम सुप्रसिद्ध हास्य कलाकार मा. प्रा.श्री. हेमंतदादा पाटील तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यासमितीचे प्रमुख प्रा.श्री. शरदचंद्र छापेकर सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे, ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री. संजय वानखेडे, पर्यवेक्षिका सौ. रमा तारे ,सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख सौ. सुवर्णा वंजारी, उपप्रमुख सौ. स्मिता करे यांच्या हस्ते माता सरस्वती पूजन करण्यात आले.तसेच प्रमुख अतिथी यांचा सत्कार प्रा.श्री.शरदचंद्र छापेकर सर यांच्या हस्ते भेटवस्तू,सन्मानपत्र,पुष्पगुच्छ,शाल देऊन करण्यात आला.उपस्थित मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर किशोर महोत्सव – 25 अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा :चित्रकला,हस्ताक्षर,निबंध ,प्रश्नमंजुषा ,कथाकथन,वक्तृत्व,पॉवर पॉईंट स्लाइड शो ,इंग्रजी व्याकरण मॉडेल,अवकाश,पृथ्वी, पर्यावरण,मॉडेल,तक्ता,हस्तकला ,गणित , विज्ञान ,पारंपरिक रांगोळी स्पर्धा,हस्तकला ,हस्तलिखित,फलक लेखन,आनंद बाजार,विविध गुणदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम,इ.स्पर्धांमधील 1200 बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व प्रशस्तिपत्र देऊन सन्माननीत करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथींनी बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचं व शाळेचे अभिनंदन करून सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे तसेच विद्यार्थांनी मोबाईलपासून दूर राहून चांगली प्रेरणादायी पुस्तक वाचण्याचे व शाळेचा नावलौकिक वाढविण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय सौ.रेखा पाटील ,सूत्रसंचालन सौ. मनिषा पवार यांनी तर बक्षीस वितरणाचे वाचन श्री. पंकज खंडाळे यांनी केले व आभार श्रीमती योगिता महाजन यांनी मानले . किशोर महोत्सव – 25 यशस्वी करण्यासाठी विविध समिती प्रमुख,उपप्रमुख, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

रेल्वे लाईनवर मोबाईलवर बोलणं बेतलं जीवावर, काय घडलं पहा

Next Post

मनसेला मोठा धक्का!वंचित बहुजन युवा आघाडीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश

Next Post

मनसेला मोठा धक्का!वंचित बहुजन युवा आघाडीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..