Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

रेल्वे लाईनवर मोबाईलवर बोलणं बेतलं जीवावर, काय घडलं पहा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 28, 2025
in क्राईम
0

अहिल्यानगर /प्रशांत बाफना
राहुरी रेल्वे स्थानक परिसरात शनिवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी रेल्वे अपघातात एका ४६ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. तांदूळवाडी (ता. राहुरी) येथील दत्तात्रय अंबादास चव्हाण (वय ४६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय चव्हाण हे सकाळच्या वेळी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे लाईनवरून जात असताना मोबाईल फोनवर बोलत होते. याच वेळी एका बाजूने गोवा एक्सप्रेस(१२७७९) ही रेल्वेगाडी येत असल्याने परिस्थितीचा अंदाज न आल्याने एका बाजूने येणाऱ्या रेल्वेगाडीच्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातस्थळी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती सरपंच विराज धसाळ यांनी तात्काळ राहुरी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल जयदीप बडे, चाँद पठाण, योगेश आव्हाड यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

राहुरी पोलिसांकडून घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे तांदूळवाडी परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे

Previous Post

जळगाव जिल्ह्यातील निंभोरा येथे भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हास्तरीय महिला धम्म मेळावा यशस्वीपणे संपन्न

Next Post

शेठ ला ना सार्व .विद्यालयात किशोर महोत्सव 25 चा बक्षीस वितरणाने समारोप”1200 विद्यार्थांचा केला सन्मान

Next Post

शेठ ला ना सार्व .विद्यालयात किशोर महोत्सव 25 चा बक्षीस वितरणाने समारोप"1200 विद्यार्थांचा केला सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

April 16, 2026

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

April 16, 2026

राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी;जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले….

April 16, 2026

साकळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

शेठ ला. ना. सा.विद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात

April 15, 2026

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

April 12, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..