
उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
जळगावचा अभिमान उंचावणारी मोठी कामगिरी आहे.
पश्चिम विभाग अस्मिता सब ज्युनिअर वूमन हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धा
दिनांक 26 ते 30 डिसेंबर 2025 रोजी राजकोट,गुजरात येथे होत आहे.
या राष्ट्रीयस्तरीय स्पर्धेसाठी हॉकी महाराष्ट्र चा संघ साठी पुणे येथे निवड चाचणीसाठी हॉकी जळगाव तर्फे सात उभरत्या खेळाडूंची अधिकृत निवड करण्यात आली असल्याची घोषणा हॉकी जळगावचे सचिव श्री. फारुख शेख यांनी केली.

निवड झालेल्या खेळाडूंची नावे
रेणुका गणेश वंजारी, अक्षरा विजय जैन,हर्षाली श्रीकांत राठोड, प्रणाक्षी मिलिंद पाटील, देविका राजेश धूत, तनिष्का उमेश सोलंके, तनिष्का रमेश्वर चाकणे
या सर्व खेळाडूंची chachni दिनांक 04 डिसेंबर 2025 रोजी
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, पिंपरी-पुणे येथे पार पडणार आहे.
शुभेच्छा व सत्कार
या सातही मुलींना निवड चाचणीसाठी रवाना करताना
फारुख शेख (सचिव, हॉकी जळगाव) imran बिस्मिल्ला (हॉकी कोच), आणि शिक्षिका जय श्री सानप यांच्या हस्ते जळगाव जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर शुभेच्छा देण्यात आल्या.
फोटो
निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा देताना फारुख शेख इमरान बिस्मिल्ला जयश्री सानप आदी दिसत आहे







