Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

यावल निवडणुकीत बाहेरील गुंडांची एन्ट्री; तुषार तायडे हल्ला प्रकरणाशी संबंध? शहरभर चर्चेचा भडका

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 4, 2025
in क्राईम
0

उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या यावल शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाला गुंडांची जोड मिळाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. मतदानाच्या दिवशी एका मोठ्या राजकीय पक्षाने बाहेरून आणलेल्या मनुष्यबळामुळे शहराचे वातावरण ढवळून निघाले.
आणि आता याच गटातील काही चेहरे तुषार तायडे हल्ला/मृत्यू प्रकरणाशी संदर्भात चर्चेत आल्याने यावलमध्ये संतापाची लाट उसळली आहे.


स्थानिक नागरिकांचा सवाल —
“निवडणुकीत गुंड मागवायचे कोणासाठी? आणि हेच चेहरे नंतर गंभीर गुन्ह्यांत कसे दिसतात?”
शहरात चर्चेचा विषय असा की, निवडणूक काळात आणलेल्या काही संशयितांची नावं तुषार तायडे प्रकरणातील तपासात फिरत असल्याची चर्चा वेगाने पसरली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संताप दोन्ही वाढले आहेत.
निवडणूक की दहशत?
मतदानाचा दिवस म्हणजे लोकशाहीचा उत्सव… पण यावलमध्ये मात्र परिस्थिती वेगळीच दिसली. राजकीय शक्तीच्या जोरावर बाहेरून दाखल झालेल्या गटांनी शहरात दहशतीचे वातावरण निर्माण केल्याची जोरदार चर्चा होती.
नागरिकांचा थेट आरोप —
“यावलमध्ये कधीही न दिसणारे चेहरे, दहा-दहा जणांच्या टोळ्या, आणि गल्लोगल्ली फिरणारी संशयास्पद वाहने… हे निवडणूक असते की रणांगण?”
तुषार तायडे प्रकरणाने राजकारणात खळबळ
तुषार तायडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण जिल्हा हादरला. आता त्याच घटनेशी कनेक्ट होणारा “निवडणुकीतील गुंड” हा मुद्दा राजकारणात वादळ निर्माण करू लागला आहे.
जनता सवाल करते—
“ज्यांना शहरातील नागरिक ओळखतही नाही, असे बाहेरचे लोक इथे का आणले गेले? आणि त्यांचा छुपा अजेंडा काय?”
लोकशाहीचा अपमान – यावलकरांचा संताप उफाळला
यावलमध्ये शांतता आणि सौहार्दाचे वातावरण नेहमीच टिकले. पण निवडणूक जिंकण्यासाठी गुंडांचा आधार घेणारे नेमके काय संदेश देतात?
यावलकरांचा आवाज बुलंद —
“आमदार असो, मंत्री असो… निवडणूक जिंकण्यासाठी गुंडांची गरज पडत असेल, तर ते लोकशाही नव्हे तर गुंडशाही आहे!”

Previous Post

जळगावच्या सात मुली पश्चिम विभाग अस्मिता सब ज्युनिअर महिला हॉकी चॅम्पियनशिप च्या निवड चाचणी साठी रवाना

Next Post

नाशिकच्या तपोवन वृक्षतोड प्रकरण; नाशिकमधील पर्यावरण प्रेमी संतापले नितेश राणेंना बकरी आणि वृक्षामधला फरक कळतो का?

Next Post

नाशिकच्या तपोवन वृक्षतोड प्रकरण; नाशिकमधील पर्यावरण प्रेमी संतापले नितेश राणेंना बकरी आणि वृक्षामधला फरक कळतो का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..