Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

1नोव्हेबर शिवसेना शिंदे गटाचा निर्धार मेळावा आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत जनतेला केले आवाहन माझा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करा आणि मोठ्या संख्येने उपस्थित रहा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 31, 2025
in राजकीय
0

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद )
भडगाव-पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत येत्या १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ‘निर्धार मेळाव्याची’ घोषणा करत जनतेला एकतेचे आणि सहभागाचे आवाहन केले हा मेळावा पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील लोढाया जीन मैदानावर सायंकाळी ५ वाजता होणार आहे.स्वबळावर निवडणूक लढवणारे महाराष्ट्रातील पहिले आमदार आमदार पाटील यांनी सांगितले की पाचोरा-भडगाव मतदारसंघातील नागरिक माझ्या वाढदिवसानिमित्त नेहमी शुभेच्छा आणि आशीर्वाद देतात. मात्र, यंदाचा वाढदिवस माझ्यासाठी खास आहे, कारण या वर्षी मी एक ऐतिहासिक निर्णय घेतला – शिवसेना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहे ! हा निर्णय घेतल्यानंतर माझा हा पहिला वाढदिवस असून, त्याच निमित्ताने ‘निर्धार मेळावा’ आयोजित केला आहे,असे त्यांनी स्पष्ट केले निर्धार मेळावा’ शिवसैनिकांच्या ऐक्याचे प्रतीक या मेळाव्याला मतदार संघातील सर्व शिवसैनिक या मेळाव्याला मतदारसंघातील सर्व शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदारांनी केले हा मेळावा केवळ कार्यक्रम नाही, तर तो आपल्या निर्धाराचा आणि एकतेचा पुरावा ठरणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पाचोरा-भडगाव मतदारसंघाने वेगळी ओळख निर्माण केली आहे, आणि ती पुढे अधिक बळकट करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे असेही आमदार पाटील म्हणाले नगरपालिका पंचायत समिती व जिल्हा परिषदांवर भगवा झेंडा फडकवण्याचा निर्धार पुढे बोलताना त्यांनी सांगितले शिवसेनेचा भगवा झेंडा नगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या इमारतीवर फडकवण्याचा आमचा निर्धार आहे. जेव्हा मी स्वबळाचा निर्णय घेतला तेव्हा पक्षाचे सर्व पदाधिकारी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते आता हा निर्णय केवळ माझा नाही तो आपल्या सर्वांच्या एकत्रित इच्छाशक्तीचा परिणाम आहे त्यांनी पुढे जोडले,एक नोव्हेंबरचा मेळावा असा व्हावा की संपूर्ण जिल्हा पाहील – आगामी निवडणुकां मध्ये त्यांनी पुढे जोडले,एक नोव्हेंबरचा मेळावा असा व्हावा की संपूर्ण जिल्हा पाहील – आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचा झेंडा सर्वत्र फडकणार आहे जनतेत उत्सुकता व उत्साह पत्रकार परिषदेच्या घोषणेनंतर पाचोरा व भडगाव परिसरात शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी बॅनर, पोस्टर व स्वागत फलक लावले जात असून, या मेळाव्याला ऐतिहासिक स्वरूप देण्यासाठी कार्यकर्ते जोरदार तयारी करत आहेत

Previous Post

कठोरा ग्रामपंचायतीचा अन्याय घरकुल जागावाटपात विलंब भीम आर्मीचा इशारा: सात दिवसांत कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषण

Next Post

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लासगाव येथे रक्तदान शिबीर कार्यक्रम संपन्न

Next Post

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लासगाव येथे रक्तदान शिबीर कार्यक्रम संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..