Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

सर्वसामान्य घरातून नगराध्यक्षपदापर्यंतचा प्रवास… आता पत्नी छाया पाटील करणार यावल नगरपालिकेत महिलांच्या जागेवरून लोकनियुक्त नगराध्यक्षा पदासाठी रिंगणात प्रवेश!

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 7, 2025
in राजकीय
0

उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व असलेले आणि यावल शहरातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील यांनी सामाजिक कार्यकर्त्यापासून नगरसेवक ते थेट नगराध्यक्ष असा उल्लेखनीय प्रवास करत यावल नगरपालिकेवर विकासाचे नवीन पर्व लिहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेने अनेक विकासकामांना गती मिळाली. शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांनी केलेली कामे आजही नागरिकांच्या मनात घर करून आहेत.
यावर्षी यावल नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण महिला श्रेणीत जाहीर झाल्याने, अतुल पाटील यांच्या पत्नी सौ. छाया अतुल पाटील यांना लोकनियुक्त नगराध्यक्षा पदासाठी निवडणूक रिंगणात उतरविण्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यामुळे यावल शहरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिस्तबद्ध कार्यशैली, दूरदृष्टी आणि जनतेशी थेट नाळ जोडणारे नेतृत्व या गुणांमुळे अतुल पाटील यांना “यावल नगरीचे शिल्पकार” अशी ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या कामांचा ठसा आजही नागरिकांच्या मनात असल्याने, शहरवासीयांची नजर आता त्यांच्या पत्नी छाया पाटील यांच्याकडे लागली आहे.
नगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता, नियोजनबद्ध विकास आणि जनतेशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणारे हे कुटुंब पुन्हा एकदा यावल नगरपालिकेच्या सत्तेत आपले नेतृत्व दाखवेल, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.
महिला आरक्षणामुळे निर्माण झालेल्या नव्या समीकरणात छाया पाटील यांची उमेदवारी ही निवडणूक रिंगणातील प्रमुख आकर्षण ठरणार आहे, अशी राजकीय पातळीवर जोरदार चर्चा सुरू आहे.

Previous Post

लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार 15 जणांना आरोग्य खाते मध्ये नियुक्त्या, आरोग्य सेवा मंडळ पुणे उपसंचालक डॉ भगवान पवार यांचा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष बबलू सोळंकी यांच्या हस्ते सन्मान,

Next Post

हॅलो बातमीदार ई-पेपर : 6 ऑक्टोबर 2025

Next Post

हॅलो बातमीदार ई-पेपर : 6 ऑक्टोबर 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..