Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

सावत्र आई आणि मुलाच्या प्रेम प्रकरणाचा दुर्दैवी अंत बदनामीच्या भीतीने मुलाची आत्महत्या; विरह सहन झाल्याने सावत्र आईने गळफास घेवून संपवली जीवनयात्रा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 29, 2026
in क्राईम
0

बीड: /प्रशांत बाफना समाजव्यस्थेतील अतुट नात्याची नैतिकता ओलांडून एकत्र आलेल्या सावत्र आई आणि मुलाच्या अनैतिक संबंधाचा अत्यंत दुर्दैवी शेवट झाल्याचे बीडच्या आंबेजागाईमधून समोर आले आहे. बदनामीच्या भीतीने मुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईने देखील रुग्णालयाच्या परिसरातच झाडाला गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे केज आणि अंबाजोगाई तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील सोनी जवळा येथील रहिवासी साहेबराव पवार वय 40 वर्षे यांचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. त्यांनतर त्यांनी चार वर्षापूर्वी अनिता नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले. पहिला संसार तुटला म्हणून साहेबराव पवार यांनी दुसरा संसार थाटला. मात्र अनितासोबत संसार सुरू असतानाच साहेबराव यांचा पहिल्या पत्नीचा मुलगा अनिल साहेबराव पवार (वय 21) याचे आपल्या सावत्र आईशी सूत जुळले. हे सूत इतके टोकाला गेले की, काही दिवसांपूर्वी अनिल आणि अनिता हे दोघे घरातून थेट तेलंगणा राज्यात पळून गेले आणि संसार थाटला.

दुसरी पत्नी आणि आपला मुलगा दोघेही बेपत्ता झाल्याने साहेबराव पवार यांनी अंबाजोगाई पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचे गांभीर्य राखून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत तांत्रिक तपासाच्या आधारे फोन ट्रॅप केला. साहेबराव पवार आणि पोलिसांनी तेलंगणा गाठून अनिता आणि अनिल या दोघांना ताब्या घेतले. मात्र घरी आल्यावर आपले अनैतिक संबंध आता सगळ्यांना समजले आहेत या भीतीपोटी आणि नैराश्येतून अनिल याने विषारी द्रव घेतले. या घटनेमुळे अनिल याची प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र चार दिवसांच्या उपचारानंतरही अनिलची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या घटनेने पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आणि संपूर्ण गावात शोककळा पसरली. याचदरम्यान सावत्र आई अनितालाही तीव्र धक्का बसला. आपल्या प्रियकराच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने अनिताने स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या व्यंकटराव डावळे सभागृहाच्या पाठीमागे असेलेल्या एका शिरीषच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

अनिताचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळताच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यासलयाचे कर्तव्यदक्ष डॉक्टर धपाटे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. डॉक्टर धपाटे यांनी अंबाजोगाई पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळाताच अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पालीस निरिक्षक शरद जोगदंड यांनी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्याच्या पथकाला सूचना दिल्या. त्यानुसार पोलिस उपनिरिक्षक कांदे व मंगेश भोसले ह तातडीन फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला. यानंतर अनिताचा मृतदेह तपासणीसाठी स्वराती रुग्णालयात पाठवण्यात आला. तसेच यास प्रकरणाचा पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत.

Previous Post

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेब महाराष्ट्राच्या ताटातील विष थांबवतील का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सावत्र आई आणि मुलाच्या प्रेम प्रकरणाचा दुर्दैवी अंत बदनामीच्या भीतीने मुलाची आत्महत्या; विरह सहन झाल्याने सावत्र आईने गळफास घेवून संपवली जीवनयात्रा

May 29, 2026

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेब महाराष्ट्राच्या ताटातील विष थांबवतील का?

May 28, 2026

नगरमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांनी काय केलं चार जणांविरोधात गुन्हा

May 28, 2026

मंडप टाकणार नाही…रणरणत्या उन्हात उपोषण करणार.. मेलो तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार .

May 28, 2026

महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल मिळू शकत स्वस्त..खा.लंके यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितला मार्ग

May 28, 2026

अमोल कोल्हे यांच्या तक्रारीची विभागीय आयुक्त कार्यालयाकडून दखल; विभागातील पाच जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 27, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..