Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

बापासह हॉटेलचालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 17, 2026
in क्राईम
0

पीडिता तीन महिन्यांची गर्भवती, पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेड्या
अहिल्यानगर | प्रशांत बाफना
जामखेड तालुक्यात वडील व मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका साडेतेरा वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीवर बापाने व एका हॉटेल चालकाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुलगी ही तीन महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुलीचा बाप व हॉटेल चालक अशा दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.याप्रकरणी पोसो, बलात्कार यासह विविध कलमान्वये जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर तालुक्यातील आनंदवाडी परिसरात पीडित मुलगी ही आपल्या आजी, आजोबा व वडिलांसह राहत आहे. मुलीच्या आईचे एक वर्षापूर्वीच निधन झाले आहे. मुलगी संगमनेर तालुयातील आश्रम शाळेत शिकत आहे, मात्र ऑटोंबर २०२५ रोजी दिवाळीच्या सुट्या लागल्याने मुलगी ही आपले आजी, आजोबा व वडील हे जामखेड तालुयातील सरदवाडी भागात ऊस तोडण्यासाठी आले होते,  त्या ठिकाणी आली होती. या भागातील एका हॉटेलवरील नळावर मुलगी आपल्या आजीसह पाणी आणण्यासाठी जात असे.

यावेळी हॉटेल चालकाची तिच्यावर नजर पडली. मुलीचे घरचे ऊसतोडणीसाठी बाहेर गेल्यावर हॉटेल चालक आरोपी जयदत्त सदाशिव कात्रजकर उर्फ नाना (रा. कुसडगाव ता. जामखेड) याने मुलीस जवळच असलेल्या मयाच्या शेतात नेत तीन वेळा अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला जीवे मारुन टाकेल, अशी धमकी दिली.यानंतर पीडित मुलीचा बाप नोव्हेंबर २०२५ रोजी दिवाळीनंतर आपल्या कुटुंबासह बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुयातील सांगवी याठिकाणी  ऊस तोडणीसाठी आला होता. त्याठिकाणी देखील मुलीच्या नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीवर नोव्हेंबर ते मार्चपर्यंत अनेक वेळा अत्याचार केला.एप्रिलमध्ये मुलगी संगमनेर तालुयातील आश्रमशाळेत वार्षिक परीक्षा देण्यासाठी दि ९ एप्रिल रोजी आली होती.

यावेळी शाळेकडून मुलीच्या आजीला मुलीची मेडीकल टेस्ट करण्यास सांगितले. मुलीची संगमनेर ग्रामीण रुग्णालयात मेडीकल टेस्ट केल्यानंतर अल्पवयीन मुलगी ही तीन महिन्यांची गर्भवती आसल्याची धक्कादायक माहिती समोर आली.संगमनेर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पीडित मुलीस व बापास जामखेड पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव यांनी मुलीस विश्वासात घेऊन विचारपूस केली. आरोपी हॉटेलचालक जयदत्त सदाशिव कात्रजकर व मुलीचा बाप अशा दोघांची नावे निष्पन्न झाली. याप्रकरणी दोन्ही आरोपींना जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासह त्यांच्या पथकाने दि.१४ एप्रिल रोजी रात्री बेड्या ठोकल्या. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक प्रविणचंद लोखंडे हे करत आहेत

Previous Post

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

Next Post

यावल सार्वजनिक बांधकाम विभागात ‘भूत’ कारभार? अभियंता-उपअभियंते कायम गायब!

Next Post

यावल सार्वजनिक बांधकाम विभागात ‘भूत’ कारभार? अभियंता-उपअभियंते कायम गायब!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..