Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

हे षडयंत्र आमच्यासाठी नवं नाही, अक्षय कर्डिलेच आमदार होणार, नेमकं काय म्हणाले सुजय विखे पाटील

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 10, 2026
in राजकीय
0

बारामतीसाठी करू शकता तर राहुरीसाठी का नाही? ः सुजय विखे पाटील
अहिल्यानगर | प्रशांत बाफना

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती सारखीच आहे. स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नेतृत्व सक्षम होते, तसेच स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले हे ही सहा वेळा आमदार झालेले आहेत. महाविकास आघाडीने राज्यपातळीवर दोन वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या आहेत. हे मागे ठेवून पुढे जायचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सक्षम आहोत. हे षडयंत्र आमच्यासाठी नव नाही. अशा प्रकारच षडयंत्र आमच्या परिवाराने स्विकारले आहे. आता राहुरीमध्ये आमच्या उमेदवारासाठी ताकद लावावी लागेल असे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

डॉ. सुजय विखे पाटील हे अहिल्यानगरमध्ये माध्यमांशी बोलत होते. डॉ. सुजय विखे पाटील यांनी विविध विषयांवर चर्चा केली. विखे पाटील म्हणाले, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अर्ज भरण्याचा अधिकार आहे. राहुरीपेक्षा बारामतीमध्ये जास्त उमेदवारी अर्ज आहेत. राहुरीत सात उमेदवार रिंगणात आहेत. राहुरीमधील अर्ज भरणार्‍या उमेदवारांना विनंती केल्यानंतर त्यांनी अर्ज माघे घेतले आहेत. स्व. शिवाजीराव कर्डिले यांचे काम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपच्या नेतृत्वाखाली अक्षय कर्डिले आमदार होतील असा विश्वास डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला.

बर्‍याच दिवसांपासून ठाकरे शिवसेनेचे खासदार शिंदे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.  काही घडत नाही. तोपर्यंत बोलण योग्य नाही. ऑपरेशन टायगर, ऑपरेश लोटस अशी बरीच नावे झाली. होईल तेव्हा कळेल. पक्ष वाढीसाठी होत असेल तर यात काही गैर नाही असे विखे पाटील यांनी सांगितले.

साकळाई योजनेचे स्वप्न शेतकर्‍यांचे आहे. साकळाईची स्वप्नपूर्ती करण्याचे काम मुख्यमंत्री फडणवीस, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील करत आहेत. या योजनेसाठी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार बबनराव पाचपुते यांनी संघर्ष उभा केला. आणि योजना पूर्ण करण्याचे भाग्य विखे कुटुंबाला लाभले असल्याचे ते म्हणाले.

डॉ. सुजय विखे पाटील यांचा खा. नीलेश लंकेंना टोला
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटी स्थापन झाली असून चौकशी सुरु आहे. या प्रकरणाचे जाळे मोठे पसरले आहे परंतु यात कुठेही विखे कुटुंबाचा संबंध आढळून येत नाही. परंतु काही लोकप्रतिनिधी सिस्पे, खरात, घोटाळा, खंडणी प्रकरणात सर्वत्र दिसतात. सर्वत्र दिसणारे असे लोकप्रतिनिधी समाजहिताचे नाहीत असे सांगत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी खासदार नीलेश लंके यांना टोला लगावला

Previous Post

साकळीमध्ये उद्या विचारांचा जागर! महात्मा फुले जयंतीनिमित्त भव्य जाहीर व्याख्यान

Next Post

कट्टर राजकीय विरोध एकाच व्यासपीठावर; शेजारी बसले, गप्पाही मारल्या!

Next Post

कट्टर राजकीय विरोध एकाच व्यासपीठावर; शेजारी बसले, गप्पाही मारल्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..