Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

हेमल गांधी पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांसाठी उपक्रमांचा वर्षाव; मनवेल येथे कार्यक्रम उत्साहात संपन्न

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 10, 2026
in शैक्षणिक
0

उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
दिनांक ८ एप्रिल २०२६, बुधवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनवेल येथे हेमल गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक जाणीव व विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी यांचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धिविनायक गोशाळा संस्थेचे अध्यक्ष व प्रेमकांत फाउंडेशनचे सामाजिक कार्यकर्ते श्री विनायक भाऊ कोळी होते. यावेळी साकळी केंद्राचे विशेष शिक्षक आदरणीय भास्कर पाटील साहेब, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडी शाळेचे मुख्याध्यापक श्री ईश्वर तागड सर व शिक्षिका श्रीमती कुंता पावरा मॅडम, मनवेल शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीता पाटील मॅडम व शिक्षक श्री दीपक चव्हाण सर, पिळोदा शाळेचे मुख्याध्यापक श्री राजू सोनवणे सर व शिक्षक श्री विरेन सोनवणे सर, ग्रामसेवक श्री भारत पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी श्री गणेश पाटील, अंगणवाडी सेविका श्रीमती कल्पना पाटील मॅडम व मदतनीस श्रीमती अलका इंधाटे मॅडम तसेच मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती संगीता पाटील मॅडम यांनी करून हेमल गांधी फाउंडेशनच्या कार्याचा सविस्तर आढावा मांडला. त्यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून होत असलेल्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी हेमल गांधी फाउंडेशनतर्फे दगडी, मनवेल व पिळोदा येथील जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना इडली, सांबर-चटणी व केळी यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मनवेल शाळेचे शिक्षक श्री दीपक चव्हाण यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमात उत्साह, आनंद व सामाजिक बांधिलकीची भावना दिसून आली.
“विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच आमच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे,” अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
सदर कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

Previous Post

शेवगावात अवैध देशी दारू विक्रीविरोधात उपोषणाचा इशारा

Next Post

साकळीमध्ये उद्या विचारांचा जागर! महात्मा फुले जयंतीनिमित्त भव्य जाहीर व्याख्यान

Next Post

साकळीमध्ये उद्या विचारांचा जागर! महात्मा फुले जयंतीनिमित्त भव्य जाहीर व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..