Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

जामखेड एसटी महामंडळाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थिनींचा उन्हात पायी प्रवास एसटी.प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उशीर

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 8, 2026
in शासकीय
0

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी, गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या हेतूने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पाचवी ते १२वी पर्यंतच्या मुलींना एसटी बसमधून मोफत प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या चांगल्या निर्णयाचा जामखेड एसटी महामंडळाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थीनींना फटका बसत आहे.

दोन ते तीन तास बसची वाट पहावी लागत आहे. कधी कधी तर बसच येत नाही यामुळे विद्यार्थीनींना चार पाच किलोमीटर अंतरावर उन्हात
पायपीट करत जावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते.
यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच वेळही वाया जात आहे.

ग्रामीण भागातील मुलींना शाळेत ये-जा करण्याची सोय व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मोफत पास देण्याची सोय केली आहे. पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना हा लाभ मिळतो.

सध्या उन्हाच्या तीव्रतेमुळे सकाळच्या सत्रात शाळा आहेत शाळेचे वेळेचे वेळापत्रक जामखेड आगाराला दिले आहे. कधी सकाळची गाडी येत नाही तर कधी दुपारी येत नाही कधी कधी दोन तास उशिरा येते. यामुळे परिक्षेच्या काळात पेपरला उशीर होत आहे.

आज बुधवार पिंपळवाडी येथील मुली सकाळी सहा साडेसहा पासून बसची वाट पाहत होत्या सव्वा सात वाजता विद्यार्थीनींचा फोन आला अद्याप बस आलेली नाही तेव्हा जामखेड एसटी महामंडळाचे डेपो मॅनेजर प्रमोद जगताप यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले बस चे नियोजन केले होते मी पाहतो परत पाच मिनिटांनी फोन केला असता ते म्हणाले बस सोडलेली आहे. ड्रायव्हर फोन उचलत नाही बस येईल पण बस आलीच नाही. यामुळे मुलींना पायपीट करत शाळेत यावे लागले. पेपरला अर्धा एक तास उशीर झाला.

बसला उशीर झाला की पालक, विद्यार्थी शिक्षकांना फोन करतात शिक्षक बस डेपो मध्ये फोन करतात यावेळी अनेक संबंधीत अधिकारी फोन उचलत नाहीत. यामुळे शिक्षकांनाही नेमके सांगता येत नाही. अनेक वेळा विद्यार्थ्यांना उन्हा तान्हात पायपीट करावी लागते. अनेक वेळा पेपर बुडतो केवळ बस महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

एसटी महामंडळाचा गलथान कारभार
वाहतूक नियंत्रक कक्षातील फोन बंद असतो.
अधिकारी खरी माहिती देत नाहीत.
बस येणार नसली तरी अधिकारी बस येईल म्हणून सांगतात. यामुळे मुलींना घरी जाण्यासाठी अनेक वेळा उन्हा तान्हात पायपीट करावी लागते, अनेक वेळा पेपरही बुडतो. विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते

Previous Post

मिनल करनवाल यांची बदली; जळगाव जिल्हा परिषदेला करिश्मा नायर यांचे नवे नेतृत्व

Next Post

शेवगावात अवैध देशी दारू विक्रीविरोधात उपोषणाचा इशारा

Next Post

शेवगावात अवैध देशी दारू विक्रीविरोधात उपोषणाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..