Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

कोरपावलीत बोगस डॉक्टरचा धुमाकूळ प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडा सिम अंतर्गत प्रकार, कारवाईनंतरही पुन्हा व्यवसाय

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 27, 2026
in आरोग्य
0

कार्यकारी संपादक :- प्राजक्ता तायडे
यावल तालुक्यातील कोरपावली हे गाव प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडा सिम अंतर्गत येत असून, येथे बोगस डॉक्टर सर्रासपणे वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. काही वर्षांपूर्वी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने या बोगस डॉक्टरवर कारवाई केली होती. मात्र कारवाईनंतरही तोच डॉक्टर आजही खुलेआम रुग्णांवर उपचार करत असल्याने आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, संबंधित बोगस बंगाली डॉक्टर कोणतीही अधिकृत वैद्यकीय पदवी नसताना उपचार करत असून गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस आणि कायमस्वरूपी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.
विशेष म्हणजे, प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडा सिम अंतर्गत हा प्रकार सुरू असताना संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष का होत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. नियमित तपासणी आणि देखरेख होत नाही का, की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. काही नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की, या बोगस डॉक्टरकडून हप्ते घेऊन त्याला संरक्षण दिले जात आहे का? जर तसे नसेल तर कारवाईनंतरही व्यवसाय सुरू कसा, असा थेट प्रश्न उपस्थित होत आहे.
आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास टिकवण्यासाठी संबंधित बोगस डॉक्टरवर तात्काळ कठोर कारवाई करणे, क्लिनिक सील करणे तसेच जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
नागरिकांची मागणी :
बोगस डॉक्टरवर कायमस्वरूपी कठोर कारवाई
क्लिनिक तात्काळ सील करणे
प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर जबाबदारी निश्चित करणे
आरोग्य विभागाच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी
दोषी आढळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई
कोरपावलीतील हा प्रकार ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या जाळ्याचे गंभीर चित्र समोर आणत आहे. आता प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Previous Post

औषध घोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ : जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना चौकशीसाठी मुंबईत हजर राहण्याचे आदेश?

Next Post

वाल्मिक कराडच्या लेकाचा फेसबुकपोस्टद्वारे इशारा ! सर्वांसमोर सर्व काही बोलणार!, सुशील कराड नेमका कोणता गौप्यस्फोट करणार ?

Next Post

वाल्मिक कराडच्या लेकाचा फेसबुकपोस्टद्वारे इशारा ! सर्वांसमोर सर्व काही बोलणार!, सुशील कराड नेमका कोणता गौप्यस्फोट करणार ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..