Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

यावल पंचायत समिती बांधकाम विभागात काळा बाजार? चौकशीची मागणी तीव्र  बाहेरील आयुक्तस्तरीय पथकाची मागणी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 21, 2026
in शासकीय
0

उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
यावल पंचायत समिती अंतर्गत बांधकाम विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार व काळा बाजार झाल्याच्या चर्चांना सध्या जोर आला आहे. विशेष म्हणजे ज्या अभियंत्यावर या कथित गैरव्यवहाराचे आरोप आहेत, तोच अभियंता सध्या वरिष्ठ अभियंता म्हणून काम पाहत असल्याने चौकशीच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये असा आरोप केला जात आहे की, मागील कालावधीत बांधकाम कामांमध्ये बॅकडेट कार्यारंभ आदेश, तांत्रिक मान्यता व अपूर्ण कामे दाखवून निधी काढल्याचे प्रकार घडले. त्यामुळे शासनाची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्याच नियंत्रणाखाली चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने चौकशी निष्पक्ष होणार का, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. यामुळे संपूर्ण प्रकरणाची विश्वासार्हता धोक्यात आल्याचे मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद जळगाव यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित अभियंत्याची चौकशी स्थानिक स्तरावर न ठेवता बाहेरील आयुक्तस्तरीय स्वतंत्र पथकाद्वारे करावी, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे. बाहेरील टीममार्फत चौकशी झाल्यास सत्य समोर येईल आणि दोषींवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, जर खरोखरच गैरव्यवहार झाला असेल तर दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून शासनाचा पैसा वसूल करावा. अन्यथा हा प्रकार प्रशासनावरील विश्वास डळमळीत करणारा ठरेल.
आता सर्वांचे लक्ष जिल्हा परिषद प्रशासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लागले असून, बाहेरील आयुक्तस्तरीय चौकशी पथक नेमले जाते का आणि कथित काळा बाजाराचा पर्दाफाश होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Previous Post

यावल पंचायत समितीतील बॅकडेटेट आदेशांचा काळाबाजार? ग्रामपंचायत कामांवर संशयाचे सावट

Next Post

समता सैनिक दलाची जळगाव जिल्ह्यात भक्कम संघटनात्मक बांधणी; शहर कार्यकारणी जाहीर

Next Post

समता सैनिक दलाची जळगाव जिल्ह्यात भक्कम संघटनात्मक बांधणी; शहर कार्यकारणी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..