Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 19, 2026
in सामाजिक
0

*शिवजयंतीनिमित्त वासुमित्रा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम; रक्तदान शिबिरात ५२ दात्यांचा सहभाग*

​जळगाव: अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून वासुमित्रा फाउंडेशन तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ५२ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
​
​कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत उत्साहात करण्यात आली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात रक्तदान शिबिराचा शुभारंभ झाला.
​
​याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष श्री. वासुभाऊ सोनवणे आणि नगरसेवक श्री. गणेशभाऊ सोनवणे यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांचा उत्साह वाढवला. वासुमित्रा फाउंडेशनचे अध्यक्ष भूषणभाऊ सोनवणे आणि उपाध्यक्ष जयेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे  नियोजन करण्यात आले होते.
​
​मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. दुपारपर्यंत ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून शिवजयंतीसारख्या पवित्र दिवशी असा उपक्रम राबवणे हीच महाराजांना खरी मानवंदना आहे,” अशा भावना आयोजकांनी व्यक्त केल्या.
​
​हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शशिकांत पाटील, श्रीकांत सोले, संदीप येवले, प्रशांत सोनवणे, उद्योजक सागरभाऊ पाटील, मनोज निंबाळकर, बबलू सपकाळे, योगेश सोनवणे, केतन सोनवणे, विनोद ढमाले, देवेंद्र मराठे, शुभम बोदडे, गितेश पवार, मारुती माळी, हेमंत रोकडे, योगेश निंबाळकर, निलेश निंबाळकर, गोलू सोनार, सचिन डोळे, मिलिंद सोनवणे, मयूर सोनवणे आणि पवन सोनवणे यांसह फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
​

Previous Post

आदिवासी एकता मंच यावल तालुका उपाध्यक्षपदी फिरोज तडवी, जिल्हा सहसचिवपदी जुम्मा तडवी यांची निवड

Next Post

अहिल्यानगर हादरले अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन जंगलात पाच दिवस केले अत्याचार ;तीन आरोपींना अटक

Next Post

अहिल्यानगर हादरले अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन जंगलात पाच दिवस केले अत्याचार ;तीन आरोपींना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..