Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

शेवगाव तालुक्यात शिवसेनेचा ‘शाखा विस्तार पॅटर्न’ ; अवघ्या दोन दिवसांत ५४ शाखांचे विक्रमी उदघाटन.माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडेंच्या पुढाकाराने संघटनात्मक बांधणीचा महाधडाका : जुनी राजकीय समीकरणे बदलणार?

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 17, 2026
in राजकीय
0

अहिल्यानगर/प्रशांत बाफना : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात शिवसेना पक्षाने (एकनाथ शिंदे गट) संघटनात्मक बांधणीचा एक नवा आणि ऐतिहासिक अध्याय लिहिला आहे.’शाखा तिथे शिवसैनिक आणि गाव तिथे शिवसेना’ या संकल्पनेला मूर्त रूप देत, तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत ५४ नवीन शाखांचे उद्घाटन करण्यात आले. या महामोहिमेमुळे शेवगावच्या ग्रामीण भागात शिवसेनेची पकड आता अधिक घट्ट झाली असून, राजकीय वर्तुळात या ‘शाखा धडाक्याची’ मोठी चर्चा असुन एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेला हा विस्तार तालुक्याच्या राजकीय इतिहासातील एक मैलाचा दगड मानला जात आहे.

गाव तिथे भगवा : ५४ गावांत शिवसैनिकांचा जल्लोष
तालुक्यातील सालवडगाव, खरडगाव, आखेगाव, मुर्शतपूर, वाडगाव, थाटे, ठाकूर निमगाव, शिंदे वस्ती, हसनापूर, कोळगाव, मंगरूळ बुद्रुक, मंगरूळ खुर्द, अंतरवाली बुद्रुक, अंतरवाली खुर्द, सुळेपिंपळगाव, चेडे चांदगाव, ठाकूर पिंपळगाव, अधोडी, राणेगाव (दोन शाखा), दिवटे, लाडजळगाव, चापडगाव, सोने सांगवी, वरखेड, राक्षी, वरूर बुद्रुक, वरूर खुर्द, भगूर, सुलतानपूर खुर्द, शहाजापूर, अमरापूर, आव्हाणे खुर्द, आव्हाणे बुद्रुक, बऱ्हाणपूर, दिंडेवाडी, चव्हाणवाडी, वडुले खुर्द, वडुले बुद्रुक, वाघोली, निंबेनांदूर, ढोरजळगाव ने, ढोरजळगाव शे, आपेगाव, आखतवाडे, मळेगाव, सामनगाव, जोहरापूर, हिंगणगाव ने, खामगाव, भातकुडगाव आणि भायगाव अशा एकूण ५४ ठिकाणी भगवा फडकवण्यात आला.

नेत्यांचा झंझावाती दौरा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे महासचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ॲड.शिवाजीराव काकडे, मा.जि.प.सदस्या हर्षदा काकडे यांच्या नियोजनातून ही मोहीम पार पडली. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर, जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले, उप जिल्हाप्रमुख दिलीप भागवत, उपजिल्हा प्रमुख अंकुश चितळे, ज्येष्ठनेते एकनाथ कुसळकर, जगन्नाथ गावडे, पृथ्वीसिंह काकडे, वैभव पूरनाळे, मारुती आव्हाड, लक्ष्मण गवळी, रामजी पोटफोडे, भाऊसाहेब सातपुते, अशोक ढाकणे, राजेंद्र फलके, नागेश पूरनाळे, मुनवर शेख, रामकिसन घनवट, भारत भालेराव, सुनील दारकुंडे, विश्वास ढाकणे, भिवसेन गिरमकर, शेषराव टेकाळे, अमोल टेकाळे, रामराव ढाकणे, प्रमोद तांबे, शिवसेनेचे अरुण मुंडे, आशुतोष डहाळे, साईनाथ आधाट, रोहित काथवटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. गावोगावी फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात या शाखांचे स्वागत करण्यात आले.

शाखा म्हणजे ‘लोकहिताचे केंद्र’
याप्रसंगी बोलताना हर्षदा काकडे यांनी सांगितले की, “या शाखा केवळ कार्यालये नसून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीची हक्काची व्यासपीठे आहेत. ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचा लाभ थेट शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम या शाखांमार्फत होईल.”

शिवसेनेचे प्रवक्ते भोर व जिल्हाध्यक्ष टायरवाले यांनी या मोहिमेचे कौतुक करताना सांगितले की, “शेवगावातून सुरू झालेला हा पॅटर्न आता संपूर्ण जिल्ह्यासाठी आदर्श ठरेल. इथला प्रत्येक शाखाप्रमुख आता गावाचा ‘विकासदूत’ म्हणून काम करेल.”

युवा शक्तीचा सहभाग
विशेष म्हणजे, हसनापूरसह अनेक ठिकाणी युवा सेनेच्या शाखांचेही उद्घाटन झाले. यामध्ये हजारो कार्यकर्त्यांनी व युवकांनी शिवसनेते प्रवेश केला. शिवसेनेकडे तरुणांचा वाढता ओघ पाहता आगामी काळात तालुक्यात युवासेनेची फळी अधिक मजबूत होणार असल्याचे चित्र दिसत आहे. दोन दिवसांच्या या ‘शाखा पॅटर्न’मुळे शेवगाव तालुक्यातील जुनी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.

चौकट : “जनतेचा शिवसेनेवर असलेला विश्वास या ५४ शाखांच्या रूपाने दिसून येत आहे. प्रत्येक गावात शिवसैनिक आता सक्षमपणे उभा असून, लोकांच्या अडीअडचणीत धावून जाण्यासाठी ही यंत्रणा सदैव तत्पर राहील.”

हर्षदा काकडे, शिवसेना नेत्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या,शेवगाव

Previous Post

साकळीमध्ये बोगस केळी विमा घोटाळ्याची चर्चा तापली; शेतकरी संतप्त  सूत्रधार कोण? चौकशीची मागणी तीव्र

Next Post

प्रा. शेखर सोनाळकर स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी

Next Post

प्रा. शेखर सोनाळकर स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

April 16, 2026

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

April 16, 2026

राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी;जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले….

April 16, 2026

साकळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

शेठ ला. ना. सा.विद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात

April 15, 2026

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

April 12, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..