
उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
केंद्रीय मानव अधिकार संघटना, नवी दिल्ली यांच्या वतीने साकळी येथील सामाजिक कार्यकर्ते मो. सलीम पिंजारी यांची प्रदेश सरचिटणीस पदावर अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती केंद्रीय मानव अधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. मिलिंद दहिवले यांच्या हस्ते नुकतीच जाहीर करण्यात आली.
सामाजिक न्याय, मानवाधिकार संरक्षण आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे सलीम पिंजारी हे यापूर्वीही ओबीसी फेडरेशनसह विविध सामाजिक व संघटनात्मक संस्थांमध्ये जबाबदारीची पदे सांभाळत असून, त्यांचे कार्य सर्वत्र कौतुकास्पद ठरले आहे. त्यांच्या कार्यकुशलतेची, स्पष्ट भूमिकेची आणि जनसामान्यांप्रती असलेल्या निष्ठेची दखल घेत ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे साकळी परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, मानवाधिकार चळवळीला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या प्रसंगी ॲड. प्रदीप जैस्वाल, ॲड. नसीर पठाण, ॲड. विजय जैन, ॲड. अमृता राणे, रामेश जाधव तसेच असंख्य सामाजिक कार्यकर्ते व हितचिंतकांनी सलीम पिंजारी यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
सलीम पिंजारी यांच्या या नियुक्तीमुळे मानवाधिकार संरक्षणाच्या लढ्याला निश्चितच बळ मिळणार असून, सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







