Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

*जळगाव महापालिकेत लोकशाहीचा ‘बाजार’! महायुतीचे १२ उमेदवार बिनविरोध; ‘साम-दाम-दंड-भेदा’ने जनमताचा गळा घोटला?

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 3, 2026
in राजकीय
0

विशेष प्रतिनिधी | जळगाव
जळगाव: सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावात काल सोन्याचा नाही, तर चक्क ‘नोटां’चा धूर निघाला. जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी शहरात जे घडले, ते पाहता जळगावकरांच्या मान शरमेने झुकल्या आहेत. महायुतीने आपले १२ उमेदवार बिनविरोध निवडून आणले, ही वरकरणी त्यांच्या राजकीय ताकदीची झलक वाटत असली, तरी पडद्यामागे जो ‘अर्थ’पूर्ण खेळ झाला, त्याने जळगावच्या राजकीय संस्कृतीचे आणि लोकशाहीचे अक्षरशः धिंडवडे काढले आहेत.
‘बिनविरोध’ की जळगावकरांवर बळजबरी?
जळगावच्या राजकारणात शह-काटशहाचे राजकारण नवीन नाही, पण कालच्या माघारी सत्रात नीतिमत्तेचा जो चक्काचूर झाला, तो भयंकर होता. महायुतीच्या १२ जागा बिनविरोध करण्यासाठी जळगावात पैशांचा अक्षरशः पाऊस पाडला गेला. समोरच्या उमेदवाराला लढण्याआधीच शरण आणण्यासाठी ज्या पद्धतीने ‘लक्ष्मीदर्शन’ घडवले गेले, ते पाहता ही महापालिकेची निवडणूक होती की जनावरांचा बाजार, हेच कळायला मार्ग उरला नाही. ज्या ठिकाणी उमेदवार पैशाने झुकले नाहीत, तिथे ‘दंड’ आणि ‘भेदा’चे अस्त्र वापरून दबावतंत्राचा कळस गाठला गेला.

​ *लोकशाहीच्या चिंधड्या*
‘साम-दाम-दंड-भेद’ वापरून जागा खिशात घालणे याला चाणक्यनीती म्हणत नाहीत, तर त्याला ‘लिलाव’ म्हणतात. काल जळगाव महापालिकेच्या ज्या १२ जागा बिनविरोध झाल्या, तिथे प्रतिस्पर्धी उमेदवारांना माघार घेण्यासाठी ज्या ऑफर दिल्या गेल्याच्या चर्चा खान्देशात रंगल्या आहेत, त्या थक्क करणाऱ्या आहेत. यामुळे त्या विशिष्ट प्रभागातील जळगावकर मतदारांचा मतदानाचा हक्कच हिरावून घेतला गेला आहे. नागरिकांनी कोणाला निवडून द्यायचे, हे ठरवण्याआधीच ‘बंद दाराआड’ झालेल्या तडजोडींनी त्यांचे भविष्य ठरवून टाकले.

​ *पैशांचा महापूर आणि विकासाचा दुष्काळ*

जळगाव शहर आधीच मूलभूत सुविधांसाठी झगडत आहे. रस्ते, गटारी आणि पाणीपुरवठ्याचे प्रश्न आ वासून उभे आहेत. अशा परिस्थितीत जर उमेदवार कोट्यवधी रुपये ओतून बिनविरोध निवडून येत असतील, तर सत्तेत आल्यावर ते शहराचा विकास करतील की आपला ‘गुंतवणूक’ झालेला पैसा व्याजासहित वसूल करतील? हा प्रश्न आता प्रत्येक सुज्ञ जळगावकराला सतावत आहे.
​कालच्या दिवशी केवळ १२ उमेदवार बिनविरोध झाले नाहीत, तर त्या १२ प्रभागांतील लोकशाही प्रक्रियेचाही अंत झाला आहे. सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर विरोधकांना नामोहरम करण्याचे हे लोण जळगावच्या भविष्यासाठी अत्यंत घातक आहे.

Previous Post

कानळदा येथील आदर्श विद्यालयात २३ वर्षांनी पुन्हा भरली शाळा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

Next Post

केंद्रीय मानव अधिकार संघटनेत साकळीचा मानाचा सन्मानसलीम पिंजारी यांची प्रदेश सरचिटणीसपदी भव्य नियुक्ती

Next Post

केंद्रीय मानव अधिकार संघटनेत साकळीचा मानाचा सन्मानसलीम पिंजारी यांची प्रदेश सरचिटणीसपदी भव्य नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..