Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

बीडमध्ये ओबीसी नेत्याच्या वाहनावर हल्ला!

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 15, 2025
in क्राईम
0

बीड:/प्रशांत बाफना ओबीसी नेते अ‍ॅड. मंगेश ससाणे यांच्या वाहनावर अज्ञातांनी शनिवारी (दि.13) हल्ला केला. माजलगावहून पुण्याकडे येताना अ‍ॅड. ससाणे यांच्या वाहनाचा पाठलाग करून धारूर जवळ त्यांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात मंगेश ससाणे यांच्या वाहनाचे नुकसान झाले. रात्री उशीरा धारूर पोलिस ठाण्यात मंगेश ससाणे यांनी अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

मागील काही महिन्यांपूर्वी माजलगाव तालुक्यातील एका हॉटेलमध्ये पवन करवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, पवन करवर हल्ल्याच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी अ‍ॅड. मंगेश ससाणे शनिवारी (दि.13) माजलगाव पोलिसाठाण्यात आले होते. सायंकाळी काम आटोपून अ‍ॅड. ससाणे रात्री उशीरा ते माजलगावाहून पुण्याच्या दिशेने धारूर मार्गे आपल्या चारचाकी वाहनाने निघाले. वाटेत विसावा हॉटेलवर थांबून पुढच्या प्रवासाला निघालेल्या अ‍ॅड. ससाणे यांच्या वाहनाचा अज्ञात दोन दुचाकीस्वारांनी पाठलाग केला.

हल्लेखोरांनी अ‍ॅड. ससाणे यांच्या वाहनावर दगडफेक केली या हल्ल्यातून अ‍ॅड. ससाणे यांना सुदैवाने दुखापत झाली नाही. मात्र, वाहनाची मागील व उजव्या बाजूची काच फुटली. अ‍ॅड. ससाणे यांनी हल्ला होताच तत्काळ सोशल मिडीयाच्या फेसबुक प्लॅटफार्मवर लाईव्ह येत घटनेची माहिती दिली. दरम्यान, अ‍ॅड. मंगेश ससाणे यांनी रात्री उशीरा धारूर पोलिस ठाणे गाठून पोलिसांना घटनेची माहिती देत तक्रार दिली. अ‍ॅड. ससाणे यांच्या तक्रारीवरून अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात धारूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओबीसी नेते अ‍ॅड. मंगेश ससाणे मंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय मानले जातात. ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनामध्ये त्यांनी वडीगोद्री, पुणे येथे उपोषण, आंदोलन केले होते. शिवाय ओबीसी आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहीला आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणा विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

Previous Post

साकळी उर्स संदल निमित्त पोलिस प्रशासन सतर्क!यावल पोलिसांच्या कडक बंदोबस्तात श्रद्धेचा उत्सव

Next Post

देशाच्या राजकारणात 19 डिसेंबरला मोठा भूकंप, मराठी माणुस पंतप्रधानपदी विराजमान होणार – पृथ्वीराज चव्हाण

Next Post

देशाच्या राजकारणात 19 डिसेंबरला मोठा भूकंप, मराठी माणुस पंतप्रधानपदी विराजमान होणार - पृथ्वीराज चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

April 16, 2026

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

April 16, 2026

राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी;जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले….

April 16, 2026

साकळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

शेठ ला. ना. सा.विद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात

April 15, 2026

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

April 12, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..