Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

नायगाव जि.प. प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 14, 2025
in शैक्षणिक
0

तालुका प्रतिनिधी:- राहुल जयकर

यावल तालुक्यातील नायगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 12 डिसेंबर, शुक्रवार रोजी बाल आनंद मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शिक्षणप्रणित्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याचे औपचारिक उद्‌घाटन नायगाव ग्रामपंचायत सरपंच सौ. नूरजान तडवी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापन समिती सदस्य गोसावी सर (शिक्षक प्रतिनिधी) तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष मा. कल्पेश राजेंद्र पवार, बीसा तडवी, राहुल पाटील, फकरी तडवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

शाळेचे मुख्याध्यापक भिरूड सर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सुव्यवस्थापन व मार्गदर्शन पदवीधर शिक्षक पारधी सर, मगरे सर, तसेच उपशिक्षिका भारती पाटील मॅडम, नजमा तडवी मॅडम, ललिता माळी मॅडम, किशोर पाटील सर आणि भटराज शिरसाठ सर यांनी केले.

बाल आनंद मेळाव्यात विविध खेळ, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे उपक्रम आयोजित करण्यात आले. लहानग्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून मेळावा रंगतदार केला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन खुनेपिंप्रे सरांनी उत्कृष्टपणे पार पाडले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवर्ग, विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थांनी सहकार्य केले. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेतून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे सर्वांनी कौतुक केले.

Previous Post

नेता नव्हे कार्यकर्ता प्रकाश संसारे सर्वांकरिता

Next Post

सोनईचे माजी सरपंच दादासाहेब वैरागर आणि ग्रामपंचायत सदस्य सचिन पवार यांच्याकडून जीवे मारण्याची धमकी…! हॉटेल व्यावसायिक अनिल शेटे पाटील यांनी दिलं जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन…!

Next Post

सोनईचे माजी सरपंच दादासाहेब वैरागर आणि ग्रामपंचायत सदस्य सचिन पवार यांच्याकडून जीवे मारण्याची धमकी…! हॉटेल व्यावसायिक अनिल शेटे पाटील यांनी दिलं जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..