Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पांढऱ्या रंगाच्या बोलेरोतुन भल्या पहाटे वाहतूक; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या; काय गवसलं?

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
December 11, 2025
in क्राईम
0

अहिल्यानगर । प्रशांत बाफना
​कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना कोतवाली पोलिसांनी जेरबंद करत साडेपाच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सायबाज नासिर पठाण (२३, चालक, रा. वाळकी) आणि मोहम्मद कैफ हाफिज कुरेशी (२५, खाटीक, रा. झेंडीगेट) अशी आहेत. गस्ती दरम्यान, कोतवाली पोलिस ठाण्याचे सफौ/ संभाजी दादाभाऊ कोतकर व पोसई/ कृष्णकुमार सेदवाड रात्री यांना मल्हार चौक, स्टेशन रोड भागात पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा बोलेरो पिकअप (एम एच १६ ए वाय ६७१०) मधून जनावरांचा आवाज ऐकून पोलिसांनी गाडी थांबवण्याचा इशारा केला, परंतु चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून गाडी ताब्यात घेतली. तपासणी दरम्यान गाडीच्या मागील हौदामध्ये चारा-पाण्याची सोय नसताना गोवंशीय जनावर दाटीवाटीने भरलेले आढळले. पोलिसांना आरोपींच्या ताब्यातील ५ लाख रुपये किंमतीची बोलेरो आणि तीन गोवंशे जनावरे असा एकूण साडेपाच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध ‘पशुसंरक्षण अधिनियम १९९५’ व ‘प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०’ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

भिंगारमध्ये दगडफेक; दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
भिंगार परिसरात ८ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास झालेल्या हाणामारी आणि दगडफेकीत चार जण जखमी झाले आहेत. या घटनेत काही वाहनांचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी फिर्यादी गणेश विजय पंडित (२५, रा. घासगल्ली, भिंगार) यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्याच्या तक्रारीनुसार भूषण लांगोटे, रोहित लांगोटे, राजू दहीहंडे, सूरज दहीहंडे, संतोष नामदे, आदित्य भेंडे, किरण सपकाळ, सागर शिंदे, अज्जू परदेशी आणि मयूर तिजोरे या दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमा करून फिर्यादीच्या घरासमोर दगडफेक केली. यामध्ये फिर्यादी गणेश पंडितसह साक्षीदार आकाश तांबे, विक्की गायकवाड आणि निलेश शिंदे हे जखमी झाले. तसेच मिनाक्षी भिंगारदिवे यांच्या घरातील टीव्ही फुटला आणि परिसरातील काही वाहनांचे नुकसान झाले. हा हल्ला जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचे जमावबंदी आदेश लागू असतानाच करण्यात आला, त्यामुळे पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम १४७, १४८, ३२४ तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तंबाखू वाहतूक करणारी कार पकडली
सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक करणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ७ लाख ३३ हजार ५०० रुपये रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ऋतिक आनंदा त्रिंबके ( रा. भुतकरवाडी, अहिल्यानगर)
याला ताब्यात घेतले आहेत. १० डिसेंबर २०२५ रोजी रात्री तारकपूर एस.टी. स्टँडजवळ असलेल्या थापर इन हॉटेल समोरील रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. ​आरोपीच्या ताब्यातून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेला सुगंधी तंबाखूचे ७ पॅकेट आणि मावा तयार करण्यासाठी लागणारी २० किलो कच्ची सुपारी तसेच गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची हुंडाई कार जप्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एम.एन. गोटला करत आहेत

Previous Post

महाराष्ट्र राज्य घरकुल संगणक परिचालक संघटना यांचा हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे धडक मोर्चा

Next Post

नाशिक तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोड तात्काळ थांबवण्यात यावी.पत्रकार बांधवांतर्फे प्रांताधिकारी श्री भूषण अहिरे यांना निवेदन.

Next Post

नाशिक तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोड तात्काळ थांबवण्यात यावी.पत्रकार बांधवांतर्फे प्रांताधिकारी श्री भूषण अहिरे यांना निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

April 16, 2026

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

April 16, 2026

राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी;जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले….

April 16, 2026

साकळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

शेठ ला. ना. सा.विद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात

April 15, 2026

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

April 12, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..