तीस लाख वृक्षलागवडीचा इंडियन बुक ऑफ रेकॉर्डचा ढोल; प्रत्यक्षात वृक्षांची उपेक्षा! निदान दर्शनी भागातील रेल्वे स्टेशनवरील वाळलेल्या झाडांकडे जिल्हाधिकाऱ्यांनी “विवेक” जागा ठेवून पाहावे – डॉ.गणेश ढवळे
बीड :/प्रशांत बाफना हवामान बदल, प्रदूषण आणि जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल ३० लाखांहून अधिक रोपांची लागवड केल्याचा गाजावाजा करण्यात आला. या उपक्रमाची "इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये नोंद झाल्याचा अभिमान व्यक्त करत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विवेक जान्सन यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले....















