
जळगांव, ३० नोव्हेंबर २०२५: स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय सौ. करुणा ताई धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार आणि प्रदेश कार्याध्यक्ष आयु. श्री. भिकन भाऊ सोनवणे यांच्या सहमतीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला आहे. प्रदेश उपाध्यक्ष श्री. विजय बापू पाटील यांच्या हस्ते मा. श्री. श्रीकांत दादा मोरे यांना जळगांव लोकसभा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती चे पत्र देण्यात आले. या नियुक्तीमुळे स्वराज्य शक्ती सेनेच्या स्थानिक कार्यात नवीन ऊर्जा आणि दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
श्रीकांत दादा मोरे हे स्वराज्य शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आणि समर्पित नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या जबाबदारीने जळगांव जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय कार्य अधिक गतीमान होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नियुक्तीच्या प्रसंगी प्रदेश संपर्क प्रमुख श्री. समाधान भाऊ बाविस्कर, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष आयु. श्री. नितीन तायडे, महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा सौ. कोमल ताई पाटील, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सौ. प्राजक्ता ताई तायडे, रावेर लोकसभा जिल्हा अध्यक्ष श्री. हर्षल ठोमरे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. हेमंत महाजन, वकील सेना जिल्हा अध्यक्ष ऍड. हेमंत दाभाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते श्रीकांत दादा मोरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या
श्रीकांत मोरे यांच्या नेतृत्वात जळगांव जिल्ह्यात स्वराज्य शक्ती सेनेचे ध्येय साकार होईल. त्यांच्या मेहनतीने पक्षाचे कार्य अधिक मजबूत होईल,” असे प्रदेश उपाध्यक्ष श्री. विजय बापू पाटील यांनी सांगितले. या नियुक्तीने सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, भविष्यातील यशस्वी मोहिमांसाठी सर्वजण कटिबद्ध असल्याचे दिसून येत आहे.
स्वराज्य शक्ती सेना ही सामाजिक न्याय, स्वराज्याच्या तत्त्वांवर आधारित एक सक्षम संघटना आहे, जी उत्तर महाराष्ट्रात वेगाने विस्तारत आहे. श्रीकांत दादा मोरे यांच्या या नवीन नियुक्ती ने यात आणखी भर घातली आहे.







