
श्याम भाऊ जक्कलवाड यांच्या लोकविश्वासामुळे विजय निश्चित.
हिमायतनगर ता.प्रतिनीधी/
हिमायतनगर – नगरपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक 8 मध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे गट) साठी अनुकूल वातावरण दिवसेंदिवस दृढ होत असून, या प्रभागातील राजकीय समीकरण श्याम भाऊ जक्कलवाड यांच्या नावाभोवती स्थिरावताना दिसत आहेत.
उमेदवारांना मिळत असलेला उत्स्फूर्त जनसमर्थन पाहता, स्थानिक मतदार त्यांना आधीच विजयी उमेदवार म्हणूनच पाहत आहेत, श्याम जक्कलवाड यांचा सांधे पणा आणि सर्वांना सहजपणे आपलेसे करणारे समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात उपस्थित राहणारी त्यांची वृत्ती आहे , नागरिकांमध्येही एकच सूर उमटतो “श्याम जक्कलवाड सच्चा समाजसेवक लोकांमध्ये मिळून मिसळून राहणारे अंगामध्ये साधे पणा आहेत, आपल्या मधले आहेत… आणि म्हणूनच त्यांच्यावरचा लोकविश्वासामुळे विजय निश्चित आहे असे मत वार्ड क्रमांक 8 मधील नागरिक व्यक्त केले आहे







