Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

शालेय विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातूनशाश्वत विकासाची मूल्ये रुजावीत हिंगोणा येथिल शालेय कार्यक्रमात आ.अमोल जावळे यांचे प्रतिपादन

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
November 28, 2025
in राजकीय
0

उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
विद्यार्थ्यांनी आपल्या उपजत चौकस बुद्धीने देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक शाश्वत विकासाची मूल्ये
अंगी बाणवावी, त्यातून आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विज्ञान तंत्रज्ञानातील नवनवीन संकल्पनांचा वेध घेणे आणि काहीतरी नवनिर्मिती करणे हाच विज्ञान प्रदर्शनाचा खरा उद्देश आहे, असे प्रतिपादन यावल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी तालुक्याचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी केले.
यावल तालुक्यातील प्रत्येक माध्यमिक विद्यालयातील सहभागी विद्यार्थी तसेच विज्ञान शिक्षकांशी प्रभात विद्यालय येथे याप्रसंगी आमदार जावळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर प्रदर्शनात मांडलेल्या उपकरणांविषयी आस्थेवाईकपणे माहिती करून घेतली तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर सूचनासुद्धा केल्या.
ज्ञानप्रकाश मंडळ संचलित प्रभात विद्यालय हिंगोणे या संस्थेचे चेअरमन श्री. रविंद्र हरी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विज्ञान प्रदर्शन उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाश मनोहर पाटील उपस्थित होते. कार्यक्रमास तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. जयंत चौधरी, जळगाव पतपेढीचे संचालक श्री. अजय पाटील, श्री. भरतभाऊ पाटील तसेच संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्यास उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी श्री. विश्वनाथ धनके यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती किरण ठाकूर मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री नरेंद्र महाले यावल तालुका विज्ञान समन्वयक, मुख्याध्यापक श्री. मनोहर गाजरे सर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

अहिल्यानगर जिल्ह्यातील शाळांना १ व २ डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर ; जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांचे आदेश

Next Post

श्याम भाऊ जक्कलवाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल – अभिषेक बकेवाड

Next Post

श्याम भाऊ जक्कलवाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल - अभिषेक बकेवाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

April 16, 2026

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

April 16, 2026

राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी;जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले….

April 16, 2026

साकळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

शेठ ला. ना. सा.विद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात

April 15, 2026

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

April 12, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..