Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

यावल नगरपरिषद निवडणुकीपूर्वी पोलिसांची मोठी कारवाई: ५० पेक्षा अधिक गुन्हेगार ताब्यात

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
November 21, 2025
in क्राईम
0

उपसंपादक मन्सूर तडवी

यावल येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावल शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून मोठी मोहीम राबविण्यात आली. शांततापूर्ण, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक पार पाडण्याच्या उद्देशाने पोलिसांनी परिसरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशान्वये तसेच फैजपूर विभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुक्यात ऑल आउट आणि कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या कारवाईसाठी ५ पोलीस अधिकारी आणि ५ विशेष पथके नेमण्यात आली होती. पथकांनी संवेदनशील ठिकाणांसह संशयितांच्या घरांची तपासणी करून उपद्रवी व रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेतले.मोहीमे दरम्यान यावल तालुक्यातील विविध गावांमध्ये तपासणी मोहिमा, वाहन तपासणी, घरांची पडताळणी आणि संशयितांची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी तलवारी, धारदार शस्त्रे आणि गुन्हेगारी कृत्यात वापरले जाणारे काही साहित्य जप्त केल्याची माहितीही समोर आली आहे.
निवडणुकांच्या अनुषंगाने कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणू शकणाऱ्या ५० पेक्षा अधिक व्यक्तींना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हलविण्यात आले.

निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, मतदारांमध्ये भयाचे वातावरण निर्माण होऊ नये आणि पूर्ण जिल्ह्यात शांततेचे वातावरण टिकून राहावे यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावल शहर तसेच तालुक्यातील नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक व्यक्त केले आहे.

Previous Post

यावलच्या सर्वांगीण विकासाची नवी दिशा महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल पाटील यांचा विकासवादाचा गजर शहरभरात उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

शिरूर कासार तालुक्यात बिबट्याची दहशत ; भीतीचे वातावरण!

Next Post

शिरूर कासार तालुक्यात बिबट्याची दहशत ; भीतीचे वातावरण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

March 2, 2026

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

March 2, 2026

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..