Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

एनकांऊटर करा किंवा कायद्यात बदल करा पण न्याय द्या, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन – जरांगे पाटील

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
November 21, 2025
in सामाजिक
0

अहिल्यानगर/प्रशांत बाफना
मालेगांवच्या डोंगराळा येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंगराळा येथील एका अल्पवयीन तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून, दगडाने तिचं डोकं ठेचून हत्या करण्यात आली, या घटनेनं राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.आरोपीला फाशीची शिक्षण देण्यात यावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेही पीडितेच्या वडिलांनी आपल्या व्यथा मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर मांडली. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी कुटुंबाकडून करण्यात आली आहे. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मोठी मागणी केली आहे. मुख्यमंत्री, महोदय दोन महिन्याच्या आत कायदा करा आणि आरोपीला फाशी द्या, नाहीतर त्याचा एनकांऊटर करा अशी मागणी यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली.

माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की,दोन महिन्याच्या आत कायदा करा आणि आरोपीला फाशी द्या, नाहीतर त्याचा एनकांऊटर करा. लाडकी लेक म्हणता, लाडकी बहिण म्हणता तर न्याय द्या. न्याय देता येत नसले तर तुमचं तोंड काळे करा. दोन महिन्याच्या आत न्याय न दिल्यास संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला. कायद्यात बदल करा, पण न्याय द्या, येत्या मंगळवारी कॅबिनेट बैठकीमध्ये कायद्यात दुरुस्ती करा, बाल लैंगिक सुधारणा कायद्यात दुरुस्ती करा. पीडितेच्या नावाने कायदा करा, या प्रकरणात उज्वल निकम यांची वकिल म्हणून नियुक्ती करा, अशी मागणीही यावेळी जरांगे पाटील यांनी केली.

महिन्याच्या आत चार्जशीट दाखल करा, आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या. न्याय न दिल्यास तुम्ही निर्दयी मुख्यमंत्री आहात असं आम्ही समजू, मालेगाव, नाशिकसह संपूर्ण राज्य बंद करणार आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणार असंही यावेळी जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, पीडित कुटुंबियांनी दहा दिवसांची मुदत सरकारला दिली आहे. अकराव्या दिवशी जर मला बोलावले तर त्या कुटुंबासाठी केव्हाही रस्त्यावर उतरेल. कुटुंबीयांशी चर्चा करताना काही मागण्या आम्ही कागदावर नोट केल्या आहेत, त्या सर्व मुख्यमंत्र्यांकडे पाठवू आणि आरोपीला फाशीची शिक्षा देवू असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

Previous Post

धानोरा पंचायत समिती गणातून जनतेच्या सेवेसाठी आफ्रीन रमजान तडवी यांची उमेदवारी निश्चितजनतेतून आणि युवक वर्गातून उमेदवारीसाठी जोरदार मागणी.

Next Post

25 नोव्हेंबर रोजी चांदण्यातलाव मोहरद तालुका चोपडा येथे नाग दीवाली च्या दिवशी शिवपंथ सत्संग नशा मुक्ती अभियान

Next Post

25 नोव्हेंबर रोजी चांदण्यातलाव मोहरद तालुका चोपडा येथे नाग दीवाली च्या दिवशी शिवपंथ सत्संग नशा मुक्ती अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

April 16, 2026

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

April 16, 2026

राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी;जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले….

April 16, 2026

साकळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

शेठ ला. ना. सा.विद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात

April 15, 2026

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

April 12, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..