
उपसंपादक मन्सूर तडवी
मोहरद तालुका चोपडा
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून धानोरा पं.स.या (अ.ज.राखीव) गनात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे एक तरुण, शिक्षित तसेच मोहरद येथील प्रथम लोक नियुक्त सरपंच मोहरद ते दिल्ली पार्लमेंट आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित श्रीमती अंजुम रमजान तडवी तसेच ज्यांची ओळख “जनतेचा राजा माणूस” म्हणून ओळख झाली आहे. असे हाजी रमजान तडवी अध्यक्ष अमिर प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल किनगाव यांचीच कन्या कुमारी आफ्रिन रमजान तडवी शिक्षण बी.एस.सी. ह्या धानोरा पंचायत समिती गणातून रिंगणात उतरणार आहे समाजहितासाठी कार्य करणाऱ्या आणि सर्व सामान्यांच्या समस्यांना आवाज देणाऱ्या आई वडील अंजुम तडवी. तसेच हाजी रमजान तडवी इच्छुक उमेदवार आफ्रीन रमजान तडवी यांच्या उमेदवारीसाठी स्थानिक जनतेत आणि युवक वर्गात संपूर्ण परिसरात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे आफ्रिन तडवी ह्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, महिला सबलीकरण, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करनार आहेत. सामाजिक प्रश्नांना शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या पात्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतील विशेषतः निराधार, विधवा, अनाथ, अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आई वडील यांनी केलेले त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद ठरले आहेत.
त्यांच्या पुढाकाराने गावोगावी सामूहिक विवाह सोहळा जनजागृती शिबिरे, आरोग्य तपासणी, रस्ते, महिलांसाठी शिवण क्लास, डोळ्यांचे शिबिर, शैक्षणिक मार्गदर्शन, स्वच्छालय, उपक्रम, अशा मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. शासनाचे विविध लाभ योजनांचे दरवाजे त्यांनी गावात संजय गांधी, श्रावणबाळ, ज्येष्ठ नागरिक या योजना साठी गावात फ्री मध्ये कॅम्प लावून सामान्य जनतेसाठी खुले केले होते, यामुळेच जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिक, मान्यवर आणि कार्यकर्त्यांच्या मते
आफ्रिन तडवी ह्या राजकारणी नाहीत, तर लोकांसाठी लढणाऱ्या खऱ्या जनसेवक ठरतील
त्यांचा शांत, संयमी स्वभाव आणि आई वडील यांच्या कार्यपद्धतीमुळे युवक युवकी वर्ग त्यांच्यामागे भक्कमपणे उभा आहे. महिलांमध्येही त्यांच्या कामाबद्दल आत्मीयता असून, त्यांच् वडील रमजान तडवी यांनी अनेक स्वयं-सहायता गटांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला आहे
अपार लोकसहभाग आणि प्रामाणिक कार्यनिष्ठेमुळे आज परिसरात दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे.
यांचे कार्य हे गौरव, प्रामाणिकपणा आणि जनहिताची दिशा दाखवणारे आहे. राजकीय क्षेत्रात स्वच्छ प्रतिमा, पारदर्शक कार्यपद्धती आणि समाजाशी असलेली बांधिलकी यामुळेच त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावोगावी, चौकाचौकात आणि युवकांच्या चर्चांमध्ये एकच नारा घुमतोय अफ्रीन तडवींना संधी मिळाली, तर ते विकासाचे आणि पारदर्शक प्रशासनाचे नवे पर्व सुरू करतील. त्यांचे आई-वडिलांचे जनतेशी असलेले नाते हे केवळ राजकीय नाही, तर भावनिक आहे आणि हीच त्यांची खरी ताकद आहे.







