दोंडाईचा प्रतिनिधी:
शिंदखेडा तालुक्यातील मौजे विखुर्ले गावातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा विखुरले येथे दि 26 जून रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक श्री रवींद्र चौधरी सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना समोर छत्रपती शाहू महाराजांचा जीवनपट उलगडून त्यांच्या कर्तृत्वाचे महत्व पटवून दिले. शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री राहुल पाटील सर यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या समता समानता व सामाजिक न्याय ही जीवनमूल्य विद्यार्थ्यांना गोष्टी रूपाने समजावली. विखुर्ले गावातील संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते श्री नवनीत बागले यांनी राजश्री शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणा- जनतेचे कल्याण- शोषित पीडित वंचित घटकांना न्याय या घटकांवर प्रकाश टाकला. श्रीयुत बागले यांनी शैक्षणिक सत्र सुरू झालेले असून गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या व पेन इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत केला. सदर कार्यक्रमास विखुर्ले गावातील सर्जनशील उद्योगपती श्री विवेक भालचंद्र तिरमले, श्री प्रदीप तिरमले, उच्चशिक्षित व शिक्षण विषयी आस्था असणारे श्री दीपक पेंढारकर त्याचबरोबर ग्रामस्थ व पालकांची उपस्थिती लाभली.
सदर कार्यक्रमास प्रशासकीय व नियोजितदृष्ट्या शिंदखेडा तालुका गटशिक्षणाधिकारी श्री डी. एस. सोनवणे साहेब व केंद्रप्रमुख श्रीमती वैशाली बच्छाव मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.