Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पाचोरातील महिलेचे एटीएम फसवणूक प्रकरण; ३.१९ लाखांची फसवणूक.पोलिस कर्मचारी शरद पाटील यांनी तांत्रिक बाबींचा वापर करत आरोपीला केले नागपुरातून अटक

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
October 24, 2025
in क्राईम
0

पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद पाचोरा येथे एक धक्कादायक फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. जिथे फिर्यादीच्या बँक खात्यातून तब्बल 3,19,516/- (रु. ३ लाख १९ हजार ५१६) रुपये अवैधरित्या काढून घेण्यात आले होते. या प्रकरणी पाचोरा पोलिसांनी तांत्रिक तपास व कौशल्याचा वापर करून आरोपीला नागपूर येथून अटक केली आहे. याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर १९७/२०२५, भादंवि कलम ४२० (फसवणूक) अंतर्गत स्वीटी योगेश संघवी (वय ३८, रा. उत्राण, ता. एरंडोल, ह.मु. संघवी कॉलनी, पचोरा) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्यात विशाल दीपक गायकवाड (वय २५, धंदा- लॅपटॉप रिपेरिंग, रा. फ्लॅट नंबर ७०२, सातवा मजला, अमर पॅलेस, धंतोली, नागपूर गुन्ह्याची थोडक्यात हकीकत फिर्यादी स्वीटी संघवी यांचा एच.डी.एफ.सी. बँकेचा खाते क्रमांक २१३६१०००००२५३८ होता, ज्याला त्यांचा मोबाईल नंबर ७८८८२१३२३८ लिंक होता. हा मोबाईल नंबर नंतर मोबाईल कंपनीने आरोपी विशाल गायकवाड याला दिला होता. फिर्यादीचे बँकेचे चेक बुक व एटीएम कार्ड कुरिअर कंपनीकडून डिलीव्हरीसाठी आले असताना, कुरिअर कंपनीने या नंबरवर फोन केला.आरोपी विशाल गायकवाड याने मुद्दाम खोटे बोलून हे पार्सल नागपूर येथील त्याच्या घराच्या पत्त्यावर मागवले पार्सल स्वीकारल्यानंतर आरोपीने त्यातील एटीएम कार्डचा पिन सेट केला. त्यानंतर २१/०३/२०२३ ते २४/०३/२०२३ या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणाहून फिर्यादीच्या बँक खात्यातून अवैधरित्या एकूण रु. ३,१९,५१६/- रुपये काढून फसवणूक केली आहे. सदर घटनेबाबत 2023 मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता.पोलिसांची कारवाई या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना, पोलीस कॉन्स्टेबल १४२२ शरद पाटील यांनी आपले कौशल्य वापरले. त्यांनी तांत्रिक बाबींचा आधार घेत आरोपीचा शोध घेतला. अखेरीस पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोउनि. कैलास ठाकूर यांच्या मदतीने त्यांनी आरोपी विशाल दिपक गायकवाड याला नागपूर येथून अटक केली. याबाबत पाचोरा प्रतितिधी शेख जावीद यांनी पोलिसांना अशा घटना यानंतर होऊ नये यावर विचारले असता पोलिसांनी त्याने प्रतिक्रिया देत सांगितले की,नागरिकांनी आपल्या बँक खात्याशी जोडलेले मोबाईल नंबर आणि गोपनीय माहिती याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Previous Post

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी श्री दिनेश ताराचंद खैरे यांची निवड

Next Post

पाचोरा भाजपतर्फे पत्रकार बांधवांसाठी दिवाळी शुभेच्छा व फराळ कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

पाचोरा भाजपतर्फे पत्रकार बांधवांसाठी दिवाळी शुभेच्छा व फराळ कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..