
पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद)
पाचोरा येथील तहसील आवारात जप्त केलेल्या ट्रॅक्टरचे साहित्य गायब झाले असून, कॅमेरे फक्त नावालाच असल्याचे चित्र आहे येथील महसूल विभागाच्या वतीने अवैध गौणखनिज वाहतूक करताना गौणखनिज पथकाने जप्त केलेले ट्रॅक्टर पाचोरा येथील तहसील आवारात लावण्यात येतात या आवारात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरेदेखील इमारतीवर लावण्यात आले आहेत असे असतानाही आवारात लावण्यात आलेल्या ट्रॅक्टरांचे टायरसह इतर साहित्य गायब असल्याचे चित्र दिसून येत आहे गौणखनिज पथकाने जप्त केलेल्या ट्रॅक्टरचे पंचनामे व मुद्देमालाची परीस्थिती व तहसील आवारातील ट्रॅक्टरांची परीस्थिती पाहता मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून येत आहे या इमारती वर लावण्यात आलेले कॅमेरे हे धुळ तर खात नाही ना असा प्रश्न जन सामान्यांतून उपस्थित होत आहे या प्रकारा कडे मात्र पाचोरा तहसीलदारांचे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष होतानाचे चित्र दिसून येत आहे असा चर्चा सुरू आहे







