
पाचोरा – भडगाव मतदारसंघात सक्रियपणे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले शेख जावीद शेख अजीज यांची दैनिक हॅलो बातमीदारचे पाचोरा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पत्रकारितेतील त्यांचा प्रामाणिक आणि निर्भीड दृष्टिकोन, तसेच समाजातील घडामोडींवर तीक्ष्ण नजरेने केलेले वृत्तांकन लक्षवेधी ठरले आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल दैनिक हॅलो बातमीदारचे संपादक सुमेध पद्माकर सोनवणे व संपूर्ण संपादकीय टीमतर्फे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
स्थानिक प्रश्न, सामाजिक विषय आणि जनतेचा आवाज प्रभावीपणे माध्यमापर्यंत पोहोचविण्याचे कार्य शेख जावीद पुढेही अधिक जोमाने करतील, असा विश्वास दैनिक हॅलो बातमीदार परिवाराने व्यक्त केला आहे.







