
उपसंपादक मन्सूर तडवी
चोपडा तालुक्यातील सर्वात मोठे लोक संख्या असलेल्या अडावद शहर व परिसरातील जवळ जवळ चाळीस गावांचा समावेश असलेल्या हद्दीत यावर्षी गणेश उत्सव व दुर्गा उत्सव तसेच ईद मिलादुन्नबी या उत्साह निमित्त सणासुधाच्या वेळेस नियोजन अत्यंत काटेकोरपणे करून सामाजिक सौहार्द व जातीय सलोखा कायम राखत उत्सव सन शांततेत पार पाडण्यात अडावद पोलीस प्रशासनाने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे या उल्लेखनीय कार्याची दखल घेत दैनिक हॅलो बातमीदार परिवार तर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांचा सत्कार करण्यात आला दैनिक हॅलो बातमीदार चे उपसंपादक तसेच माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व महिला आघाडी चे खानदेश विभाग कार्याध्यक्ष मन्सूर एस तडवी व चोपडा तालुका प्रतिनिधी मिलिंद वाणी तसेच अडावद येथील लोकनियुक्त सरपंच बबन लालखा तडवी. सोबत माजी सरपंच सचिन महाजन ग्रा. प .सदस्य पंकज भीमराव महाजन जहीर दादा. ताहेर मेंबर. शाहरुख मेंबर. यांनी पोलीस स्टेशनला भेट देऊन प्रमोद वाघ साहेब यांना पुष्पगुच्छ शाल देऊन गौरविण्यात आले तसेच अडावद येथे पूर्ण पोलीस कर्मचारी स्टाफ यांचे आभार व्यक्त केले गेल्या काही दिवसात अडावद परिसरात गणेश उत्सव ईद मिलादून नबी दुर्गा उत्सव साजरा करण्यात आला विविध ठिकाणी मिरवणुका सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक विधी पार पाडले अशा परिस्थितीत शांतता सुव्यवस्था आणि सलोखा राखण्यासाठी अडावद पोलीस प्रशासनाने व्यापक नियोजन करून उत्कृष्ट पोलीस बंदोबस्त उभारला कोणतीही ठिकाणी अनुचित घटना न घडता सर्व उत्सव अत्यंत शांततेत पार पाडले यावेळी सामाजिक कार्यकर्ते तसेच गावातील सरपंच सदस्य यांचेही उत्सव निमित्त सहकार्य लाभले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दैनिक हॅलो बातमीदार परिवारचे तसेच सरपंच ग्रामपंचायत सदस्य गावकऱ्यांचे आभार मानले व पुढेही नागरिकांच्या सहकार्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले व परिसरातील नागरिकांकडूनही पोलीस प्रशासनाच्या सजक व प्रभावी कामगिरीचे कौतुक होत आहे







