Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

शिक्षण विभागात बेशिस्तीचा कळस – माध्यमिक शिक्षण अधिकारी व्यक्तिगत कार्यक्रमासाठी ७ कर्मचाऱ्यांना घेऊन ऑफिसमधून निघाल्या !

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
June 14, 2025
in शैक्षणिक
0

जळगाव, दि. १३ जून २०२५ – जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागात प्रशासनाच्या शिस्तीला हरताळ फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण मॅडम यांनी दिनांक १३ जून रोजी एका वैयक्तिक कार्यक्रमासाठी ऑफिसमधील तब्बल ७ कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कार्यालय सोडल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांमध्ये ३ उपशिक्षण अधिकारी, १ लिपिक, २ शिपाई आणि एक OS अधिकारी यांचा समावेश होता. सर्व कर्मचारी व स्वतःशिक्षणाधिकारी मॅडम सोबत एका नामांकित परिसरात एका खासगी कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्यामुळे कार्यालय पूर्णपणे रामभरोसे होते, कोणतीही अधिकृत परवानगी अथवा बदल अधिकारी नियुक्त करण्यात आलेला नव्हता.

या घटनेमुळे जळगांव जिल्हा परिषद शिक्षण विभागातील शिस्त व कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शासकीय कामकाज चालू असताना कार्यालयीन वेळेत एवढ्या संख्येने कर्मचारी खासगी कार्यक्रमासाठी घेऊन जाणे हे पूर्णपणे बेकायदेशीर व निष्काळजीपणाचे लक्षण मानले जात आहे.

शासनाच्या नियमांनुसार कोणताही अधिकारी खासगी कार्यक्रमासाठी शासकीय कर्मचार्‍यांना कार्यालयीन वेळेत घेऊन जाऊ शकत नाही. यामुळे जनतेच्या कामांना खोळंबा झाला असून, कार्यालयात आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले.

या प्रकाराची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता शिक्षण क्षेत्रातील संघटना व जनतेकडून होत आहे.

हा प्रकार केवळ शासकीय कामकाजातील हलगर्जीपणा नसून, अधिकाराचा दुरुपयोग देखील मानला जातो. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून कारवाई करणे अपेक्षित आहे.

Previous Post

पिंप्राळा हुडकोत कोयत्याने हल्ला!  पोलिसात तक्रारीवरून वाद, दोन्ही गटात हाणामारी; आठ जणांवर गुन्हा, तिघे अटकेत

Next Post

कृष्णाई युवा मंचच्या वतीने वारकऱ्यांना सकाळी डोसा उत्तप्पा साबण तेल पावसाळी रेनकोट आदींचे वाटप,

Next Post

कृष्णाई युवा मंचच्या वतीने वारकऱ्यांना सकाळी डोसा उत्तप्पा साबण तेल पावसाळी रेनकोट आदींचे वाटप,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..