
उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व असलेले आणि यावल शहरातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील यांनी सामाजिक कार्यकर्त्यापासून नगरसेवक ते थेट नगराध्यक्ष असा उल्लेखनीय प्रवास करत यावल नगरपालिकेवर विकासाचे नवीन पर्व लिहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेने अनेक विकासकामांना गती मिळाली. शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांनी केलेली कामे आजही नागरिकांच्या मनात घर करून आहेत.
यावर्षी यावल नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण महिला श्रेणीत जाहीर झाल्याने, अतुल पाटील यांच्या पत्नी सौ. छाया अतुल पाटील यांना लोकनियुक्त नगराध्यक्षा पदासाठी निवडणूक रिंगणात उतरविण्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यामुळे यावल शहरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिस्तबद्ध कार्यशैली, दूरदृष्टी आणि जनतेशी थेट नाळ जोडणारे नेतृत्व या गुणांमुळे अतुल पाटील यांना “यावल नगरीचे शिल्पकार” अशी ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या कामांचा ठसा आजही नागरिकांच्या मनात असल्याने, शहरवासीयांची नजर आता त्यांच्या पत्नी छाया पाटील यांच्याकडे लागली आहे.
नगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता, नियोजनबद्ध विकास आणि जनतेशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणारे हे कुटुंब पुन्हा एकदा यावल नगरपालिकेच्या सत्तेत आपले नेतृत्व दाखवेल, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.
महिला आरक्षणामुळे निर्माण झालेल्या नव्या समीकरणात छाया पाटील यांची उमेदवारी ही निवडणूक रिंगणातील प्रमुख आकर्षण ठरणार आहे, अशी राजकीय पातळीवर जोरदार चर्चा सुरू आहे.






