Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते संदीप राक्षे लिखित “भटकंती धरतीच्या स्वर्गाची” या पुस्तकाचे प्रकाशन!

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
September 25, 2025
in शैक्षणिक
0

प्रतिनिधी सोनाली योगेश मोरे
लेखक संदीप राक्षे यांच्या भटकंती धरतीच्या स्वर्गाची या प्रवासवर्णन पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार दि. २३ सप्टेंबर रोजी पिंपरी येथील औद्योगिक शिक्षण मंडळाच्या भव्य ऑडिटोरियममध्ये, महानायक, आंबी, झाडाझडती, पांगिरा, चंद्रमुखी, संभाजी या कादंबरीचे लेखक व ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, पानिपतकार विश्वासजी पाटील, पद्मश्री गिरीशजी प्रभुणे, आमदार जेष्ठ साहित्यिक राजनजी लाखे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आमदार अमित गोरखे, औद्योगिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संदीप पाचपांडे आणि यशस्वी गृपचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी हे उपस्थित होते. संदीप राक्षे यांनी याआधी “वारसा शिल्पकलेचा”, “हेमलकसा एक रोमहर्षक सफर”, आणि “लेण्यांचा महाराष्ट्र” ही प्रवासवर्णन पुस्तके लिहिली असून, “भटकंती धरतीच्या स्वर्गाची” हे त्यांचे चौथे पुस्तक ठरले आहे. विशेष बाब म्हणजे, या सर्व पुस्तकांचे वितरण संदीप राक्षे वाचकांना विनामूल्य करतात. त्यांचा उद्देश वाचन संस्कृती रुजवणे, पर्यटनाला चालना देणे आणि अपरिचित ठिकाणांना वाचकांसमोर आणणे हा आहे. सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी “भटकंती धरतीच्या स्वर्गाची” या पुस्तकाचे विशेष कौतुक केले. पिंपरी चिंचवड मधील साहित्यिकांच्या बरोबरच औद्योगिक शिक्षण मंडळाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे भव्य आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेने केले होते..

Previous Post

पुणे कॅन्टोन्मेंट पुस्तक पतपेढीच्या वतीने 50 आदर्श शिक्षक व मुख्याध्यापकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान,

Next Post

शिंदखेडा तालुक्यातील देवाचे विखरण गावातील विर शिरोमणी महाराणा प्रताप ग्रुप यांच्या संकल्पनेतून विखरण येथे

Next Post

शिंदखेडा तालुक्यातील देवाचे विखरण गावातील विर शिरोमणी महाराणा प्रताप ग्रुप यांच्या संकल्पनेतून विखरण येथे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

April 16, 2026

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

April 16, 2026

राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी;जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले….

April 16, 2026

साकळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

शेठ ला. ना. सा.विद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात

April 15, 2026

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

April 12, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..