Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

आपला दवाखाना” व “वर्धनी केंद्र” घोटाळा प्रकरणात दोन सदस्यीय चौकशी समिती स्थापन १५ ऑगस्टचे आमरण उपोषण स्थगित

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
August 14, 2025
in ताज्या बातम्या
0

जळगाव – भीम आर्मी भारत एकता मिशनचे जिल्हाध्यक्ष आयु. गणेश भाऊ सपकाळे यांनी जळगाव जिल्ह्यातील “आपला दवाखाना” व “वर्धनी केंद्र” यांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत पत्रकार परिषदेत प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली होती. १४ ऑगस्टपर्यंत चौकशी समिती स्थापन न झाल्यास १५ ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन तक्रार अर्ज सादर केल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी दोन सदस्यीय समिती नेमली आहे.

समिती सदस्य:

श्री. हेमंत भदाणे – जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास विभाग, जळगाव (समिती अध्यक्ष)

श्री. विनोद चावरिया – उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी, अर्थ विभाग, जळगाव (समिती सदस्य)

ही समिती संबंधित केंद्रांवर प्रत्यक्ष तपासणी करून, तक्रारीतील मुद्द्यांची पडताळणी करणार असून १५ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करणार आहे.

समिती स्थापन झाल्यामुळे १५ ऑगस्ट रोजी होणारे आमरण उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती भीम आर्मी जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रबुद्ध खरे व राहुल मंगलाबाई लक्ष्मण जयकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

Previous Post

ऑल इंडिया संविधान आर्मी तर्फे मुंबई दादर येथे विविध प्रमुख मागण्यांसाठी राज्यव्यापी आक्रोश रेल रोको आंदोलन,

Next Post

संतोष कांबळे यांची आरपीआय (आठवले) पुणे शहर सचिव पदी नियुक्ती,

Next Post

संतोष कांबळे यांची आरपीआय (आठवले) पुणे शहर सचिव पदी नियुक्ती,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री .विलास नाना साळवे यांची निवड

March 2, 2026

पारंपरिक वाद्य कालबाहय वादकांवर उपासमारीची वेळ…? तुतारी वाद्य नामशेष होण्याच्या मार्गावर..

March 2, 2026

मध्यपूर्वेत तणाव वाढला; भारत सरकारकडून सुरक्षा ॲडव्हायझरीमहाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्कतेचे आवाहन

March 1, 2026

धनंजय मुंडेंच्या केसाला धक्का लागला तरी खेळ खल्लास; आमदार सुरेश धससह जरांगेंना मुंडेंच्या समर्थकाची खुलेआम धमकी

March 1, 2026

आश्रम शाळा मगरूळ येथे गंभीर अनियमितता; विद्यार्थी अनुपस्थित, मुख्याध्यापक गैरहजर

March 1, 2026

‘दैनिक हॅलो बातमीदार’च्या दणक्याने कोरपावलीतील बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले; प्रशासनाकडून अखेर नोटीस!

March 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..