Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 12, 2026
in क्राईम
0

कासोदा प्रतिनिधी शेख जावीद)
कासोदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू व्यवसायावर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत मोठा फटका दिला. ताडे, आडगाव, निपाणे व नांदखुर्द बु. परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर अड्ड्यांवर एकाच वेळी छापे टाकत तब्बल १२०० लिटर रसायन व तयार दारू जागेवरच नष्ट करण्यात आली.या कारवाईत हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, साहित्य आणि तयार दारू असा सुमारे ₹६० हजारांचा मुद्देमाल उद्ध्वस्त करण्यात आला. या प्रकरणी कासोदा पोलीस स्टेशनमध्ये अवैध दारूसंदर्भात ४ गुन्हे दाखल करण्यात आले असून, संबंधितांवर कडक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे ही मोहीम पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.कासोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि श्रीकांत पाटील यांनी अत्यंत बारकाईने नियोजन करत चार स्वतंत्र पथके तयार केली, ज्यांनी समन्वय साधत एकाच वेळी विविध ठिकाणी छापे टाकून हातभट्टी अड्ड्यांचा पूर्णपणे सफाया केला.या धडक कारवाईत पोलीस कर्मचारी रामकृष्ण पाटील, नंदलाल परदेशी, किरण गाडीलोहार, अकिल मुजावर, योगेश पाटील, लहु हटकर, कुणाल देवरे व सोनु पाचुंदे यांनी सक्रिय सहभाग नोंदवून मोहिम यशस्वी केली अवैध दारू व्यवसायाविरोधात पोलिसांचा ‘झिरो टॉलरन्स’ संदेश स्पष्ट कासोदा पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध हातभट्टी व्यवसायकरणाऱ्यां मध्ये खळबळ उडालीअसून,“ कायद्याच्या विरोधात* जाणाऱ्यांना आता कुठेही आश्रय नाही” असा ठाम संदेश प्रशासनाने दिला आहे.

Previous Post

यावलमध्ये वन विभागाची धडक कारवाई! सागवान लाकूड तस्करी उधळली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

April 12, 2026

यावलमध्ये वन विभागाची धडक कारवाई! सागवान लाकूड तस्करी उधळली

April 12, 2026

थोर समाजसुधारक क्रांतीकारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती निमित्त जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यलयात उत्साहात साजरा

April 11, 2026

कट्टर राजकीय विरोध एकाच व्यासपीठावर; शेजारी बसले, गप्पाही मारल्या!

April 11, 2026

हे षडयंत्र आमच्यासाठी नवं नाही, अक्षय कर्डिलेच आमदार होणार, नेमकं काय म्हणाले सुजय विखे पाटील

April 10, 2026

साकळीमध्ये उद्या विचारांचा जागर! महात्मा फुले जयंतीनिमित्त भव्य जाहीर व्याख्यान

April 10, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..